नवी दिल्ली,
Mahakumbh Mela : महाकुंभाच्या काळात प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, अशी कोणतीही तरतूद नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. कुंभमेळादरम्यान मोफत प्रवासाची परवानगी असल्याचा दावा करणारे वृत्त काही माध्यमे प्रसारित करीत असल्याचे रेल्वेच्या लक्षात आल्यानंतर, हे वृत्त पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारे असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले.
महाकुंभाच्या काळात प्रवाशांसाठी अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्ध आहे. प्रवाशांच्या अपेक्षित गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष होल्डिंग क्षेत्रे, अतिरिक्त तिकीट काऊंटर आणि इतर आवश्यक सुविधांसह पुरेशी व्यवस्था केली जात आहे, असे रेल्वेने नमूद केले.