विधानसभेत देवळीचा आवाज! खरेदी-विक्री दस्त नोंदणी कार्यालय पूर्णवेळ द्या

*आ. बकाने यांची मागणी

    दिनांक :19-Dec-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
देवळी, 
Rajesh Bakane : देवळी हे तालुक्याचे तर पुलगाव हे अपर तहसील असून सुद्धा येथे दस्त नोंदणी कार्यालयाचे काम आठवड्यातून फक्त दोन दिवसच चालतात. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे देवळीत सर्व सोयी सुविधांसह खरेदी-विक्री दस्त नोंदणी कार्यालय पूर्णवेळ द्यावे, अशी मागणी आ. राजेश बकाने यांनी आज गुरुवार 19 रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना केली.
 
 
 
bakane
 
 
 
देवळी तालुक्याचे ठिकाण असून येथे आठवड्यातून दोन दिवस व पुलगाव हे अप्पर तहसील असून आठवड्यातून 3 दिवस रजिस्टर खरेदी-विक्री नोंदणी उपलब्ध आहे. त्यामुळे देवळी मतदार संघाच्या या दोन्ही गावातील नागरिकांची गौरसोय होते. देवळी येथे ऑनलाईन नोंदणी होत नसल्याने येथे त्वरित नोंदणी बाबतचे कागदपत्र मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची कामे अडकून राहतात. या संदर्भात देवळी-पुलगाव मतदार संघातील 80 गावांतील तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सोबतच देवळी मतदार संघातील शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांचा मोठा त्रास आहे. यासाठी 100 टक्के अनुदानावर शेताचे कुंपण मिळावे. रिझर्व्ह फॉरेस्टच्या ठिकाणी या शेती असतात. त्या ठिकाणी 85 टक्के अनुदानावर कुंपण दिले जाते अशा ठिकाणीही 100 टक्के अनुदानावर शेती कुंपण देण्यात यावे, अशी मागणीही आ. बकाने यांनी केली. आ. बकाने यांनी आमदारकीची शपथ घेताच कामाला सुरुवात केली