मुंबई,
Ajit pawar on Kalyan attack शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी शुक्रवारी (20 डिसेंबर) विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मशनच्या माध्यमातून कल्याणमध्ये झालेल्या मराठी माणसावरील हल्ल्याचा मुद्दा मांडला. प्रभू यांनी या घटनेची संपूर्ण माहिती विधानसभेत दिली. ज्यानंतर त्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महत्त्वाचे आश्वासन देण्यात आले आहे. ज्यानंतर त्यांच्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेतील आरोपी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय न करता त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवारांकडून देण्यात आले आहे.
परभणीमधील हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन सादर केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी परभणी हिंसाचाराची पार्श्वभूमी आणि झालेला घटनाक्रम सांगितला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. Ajit pawar on Kalyan attack त्याशिवाय ही चौकशी ही पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले. विरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपल्या आसनावर ठेवला. या कृतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केले