विश्लेषण
- अश्विनी मिश्रा (दिल्ली)/सुमन दास(ढाका)
उत्तरार्ध उत्तर
Bangladesh violence : चितगाव येथील विद्यार्थी भास्कर भट्टाचार्य (नाव बदलले आहे) याने सांगितले की, ३१ ऑक्टोबर रोजी जेव्हा चिन्मय प्रभू यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर लगेच आम्ही एका रॅलीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बीएनपी छात्र दल, विद्यार्थी शाखा छात्र शिबिर, पोलिस आणि गुप्तचर एजन्सी हिंदूंवर, विशेषत: तरुणांवर लक्ष ठेवून होते आणि त्यांचे फोनही टॅप केले जात होते. अशा परिस्थितीत आम्ही एकटे किंवा समूहाने कुठेही जाऊ शकत नव्हतो. आम्ही जर एकटे बाहेर पडलो असतो तर आमच्यावर हल्ले झाले असते आणि आम्ही ग्रुपमध्ये असतो तर आमच्यावर नजर गेली असती.
भास्कर भट्टाचार्य पुढे म्हणाला, बांगलादेशातील प्रत्येक मंदिरावर जिहादींद्वारे लक्ष ठेवले जात आहे. तसे पाहता २६ जानेवारीपासूनच आमच्यासाठी परिस्थिती प्रत्येक क्षणी बिघडत चालली होती. प्रत्येक क्षण आम्हाला एका नव्या भीतीदायक क्षणाकडे घेऊन जात आहे. साधू, तरुण आणि विवाहित हिंदू महिलांना विशेष करून लक्ष्य केले जात आहे.
Bangladesh violence : राजकीय पक्षांच्या शाखा पूर्वीपेक्षा अधिक आक्रमकपणे सक्रिय आहेत. हे लोक अशा हिंदू युवकांची यादी तयार करीत आहेत ज्यांच्याबद्दल थोडीशीही शंका आहे. इथे द्वेषाची परिस्थिती अशी आहे की आमचे मुस्लिम मित्र आम्हाला बोलायला प्रवृत्त करतात आणि आम्ही काही बोललो किंवा कुठली प्रतिक्रिया दिली तर ते ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे त्याला मुद्दा बनवतात. परिस्थिती इतकी गंभीर आहे की पुढच्या क्षणी काय होईल या भीतीच्या छायेतच आम्ही नेहमी राहतो.
कायम भीतीच्या छायेत राहणारा भास्कर भट्टाचार्य हा केवळ एकमेव विद्यार्थी नाही. बांगलादेशी लष्कराने हृदयपालला दिलेली कठोर वागणूक आणि जिहादी कट्टरतावाद्यांच्या धमक्या यावरून बांगलादेशातील हिंदू तरुण कोणत्या परिस्थितीचा सामना करीत आहेत, हे लक्षात शाळा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या असून हिंदू तरुणांच्या कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे.
Bangladesh violence : या घटना एक धोकादायक प्रवृत्ती दर्शवितात, जिथे अल्पसंख्यकांना घाबरवून, धमक्या देऊन त्यांना गप्प करण्याबरोबरच त्यांना कायम दहशतीत ठेवण्यासाठी हिंसाचाराचा बळी बनवले जात आहे, त्यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत, ज्यामुळे अल्पसंख्यक स्वत:ला असुरक्षित आणि असहाय एकाकी पडतात. अशाप्रकारे विविध डावपेचांचा अवलंब करून अल्पसंख्यकांना विस्थापित करण्यास भाग पाडले जात आहे. अनेकदा अशा प्रकरणात कोणतीही कारवाई होत नाही.
सोशल मीडियाचा गैरवापर
जिहादी इस्लामिक कट्टरपंथी सोशल मीडियाचा वापर एक घातक शस्त्राच्या स्वरूपात करीत आहेत. याद्वारे ते अफवा पसरवून मुसलमानांना हिंदूंवर हल्ले करण्यास प्रवृत्त करीत आहेत. ९ ऑक्टोबर एक सत्यापित सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्ती उझैर इब्न तालिब याच्या एका पोस्टने बांगलादेशातील आधीच नाजूक व अशांत परिस्थिती अधिकच बिघडवली. आपल्या पोस्टमध्ये उझैरने चिथावणीखोर प्रश्न विचारला की, राक्षसाना हिरव्या त्वचेसह का दर्शविण्यात आले आहे? धार्मिक दृष्टीने इस्लाममध्ये हिरव्या रंगाला महत्त्वाचे स्थान आहे आणि हा हिरवा रंग राक्षसांचे प्रतीक म्हणून आला आहे, असे उझैर इब्न तालिबने आपल्या पोस्टमध्ये लिहून भडकलेल्या आगीत तेल ओतण्याचेच काम केले.
Bangladesh violence : वास्तविक, हिरवा रंग इस्लामशी संबंधित आहे आणि मुस्लिमबहुल देशांचे झेंडे आणि धार्मिक चिन्हांमध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग होतो. याचाच आधार घेऊन उझैरने दोन समुदायांमध्ये आग लावली. मात्र, एवढे होऊनही त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली याउलट त्याने वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी धार्मिक प्रतीकांना अस्त्र बनवणे सुरूच ठेवले आपल्या समुदायातील लोकांना भडकावले. उझैरसारख्या प्रभावशाली व्यक्तीची बेजबाबदार आणि द्वेषपूर्ण वागणूक त्याचा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा अधोरेखित करते. उझैरसारख्या व्यक्तींमुळेच बांगलादेशातील अल्पसंख्यकांवर हल्ले करण्यास जिहादींना बळ मिळते. उझैर इब्न तालिबसारखे प्रभाशाली लोक कट्टरवादाला व फुटीरवादाला प्रोत्साहन देत असल्याने सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख धोक्यात आली आहे.
महिला आणि लहान मुले रडारवर
त्याचप्रमाणे, बांगलादेशात हिंदू महिला आणि मुलांना सुनियोजित हिंसाचाराद्वारे लक्ष्य केले जात आहे. अशाप्रकारचा हिंसाचाराचा एक पॅटर्नच समोर आला आहे. यामुळे दडपशाही, शोषण व संस्थात्मक उदासीनतेचे भीषण वास्तव अधोरेखित झाले आहे. बोगुरा येथील १५ वर्षीय रूपा आणि सीमा यांसारख्या मुली याची जिवंत उदाहरणे आहेत. या मुली अचानक गायब झालेल्या नाहीत, तर हिंदू अल्पसंख्यकांना घाबरवण्यासाठी आणि अस्थिर करण्यासाठी जाणीवपूर्वक आखण्यात आलेल्या रणनीतीचा एक भाग म्हणून या दोघींना गायब करण्यात आले. धार्मिक विधी दरम्यान पुरोनिता पाल या मुलीचे २०-२५ मुस्लिम युवकांनी अपहरण करून तिचे बळजबरीने धर्तांतर करून तिचे नाव जन्नतुल फिरदौस ठेवले. हा वैयक्तिक त्रासापेक्षाही सांस्कृतिक आणि धार्मिक अस्मितेवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे.
Bangladesh violence : हिंसाचाराचे हे तंत्र गुंतागुंतीचे आणि बहुआयामी आहे. यामध्ये बळजबरीने धर्मांतर महत्त्वाची भूमिका बजावते. दुसरीकडे, लैंगिक हिंसा हे धर्मांध जिहादींचे एक प्रमुख शस्त्र आहे. पाईकगाचा येथे भारतीवर तिच्या मुलाला जीवे मारण्याची देऊन ६ जणांनी सामूहिक बलात्कार तसेच जेसोरमधील सविता राणीची हत्याही याच लक्ष्यीत क्रौर्याला अधोरेखित करते. ही निव्वळ गुन्हेगारी स्वरूपाची कृत्ये नाहीत, तर भीती, दहशत आणि अधीनता निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून आखण्यात आलेले व प्रत्यक्ष कृतीत आणलेले हे डावपेच आहेत. दुर्गापूजेच्या वेळी शांता सरकारचे रहस्यमय पद्धतीने गायब होणे, ज्यात स्थानिक पोलिसांनी फारसा रस दाखवला नाही, हे संस्थात्मक दुर्लक्षाचे उदाहरण आहे.
बर्याचदा संघटित नेटवर्कद्वारे हिंदू युवतींचे पद्धतशीरपणे अपहरण, धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले जाते, ज्यांना कायद्याची कुठलीही भीती नाही. सामाजिक पायाभूत सुविधा, कायदेशीर प्रणाली, स्थानिक प्रशासन आणि सामुदायिक संरचना त्यांच्या निष्क्रियतेमुळे गोंधळलेली दिसते. तरुण महिलांना लक्ष्य करून कौटुंबिक आणि सामुदायिक संरचना दुर्बळ करणे, सांस्कृतिक सातत्य आणि ओळख नष्ट करणे हे गुन्हेगारांचे लक्ष्य आहे. रूपा, पुरोनिता, भारती, सीमा शांता आणि सविता यांची प्रकरणे केवळ वैयक्तिक त्रास देण्याची नाहीत. ती पद्धतशीर हस्तक्षेप, कायदेशीर उत्तरदायित्व आणि अल्पसंख्यक समुदायांसाठी सामाजिक सुरक्षेच्या मूलभूत पुनर्कल्पनेसाठी तातडीचे आव्हान आहेत.
Bangladesh violence : बांगलादेशातील हिंदू महिला कार्यकर्त्या उषा मंडल (नाव बदलले आहे) म्हणतात, ‘‘जिहादी, कट्टरपंथी मुसलमान स्त्रियांवर बलात्कार करतात, मंदिरे, प्रार्थनास्थळे आणि घरे जाळतात. मात्र, युनूस सरकार हिंदूंना मदत करण्याऐवजी दहशतवादी आणि मुस्लिमांना संरक्षण देत आहे. मुसलमानांनी सशस्त्र दलांच्या मदतीने सुदूर, दुर्गम भागातील हिंदूंच्या घरांवर हल्ले केले आणि लुटालूट केली. मात्र युनूस सरकार आणि प्रसारमाध्यमे या घटना लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदूंना खोट्या प्रकरणात अडकवले आहे, हिंदू शिक्षकांना शाळा आणि महाविद्यालयांमधून राजीनामे देण्यास भाग पाडले जात आहे. बांगलादेशात हिंदूंचा मुस्लिम बहुसंख्यकांकडून नेहमीच छळ होत असतो, येथे हिंदूंना माणूस मानले जात नाही.’’
केवळ नवतरुण आणि हिंदू महिलाच कट्टरवाद्यांचे लक्ष्य आहेत, असे नाही. काही वृत्तांंमध्ये असे म्हटले आहे की एका विशिष्ट ब्रँडचा केेक, जो लहान मुलांमध्ये आहे, याबाबततही कटकारस्थान आहे. केकमध्ये एक गोळी लपवली जात आहे, ज्यामुळे मुलांना अर्धांगवायू होऊ शकतो. हे केक हिंदूबहुल भागात मुलांना अपंग करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून विकले जात आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, केकमध्ये ठेवलेल्या गोळ्या एक हानिकारक पदार्थ सोडतात, ज्यामुळे मज्जासंस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते. अनेकदा मुले कुठलाही विचार न केक खाऊन टाकतात. पालकांना काय घडले आहे हे लक्षात येईपर्यंत कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
Bangladesh violence : याबाबत अल्पसंख्यक समाजाच्या नेत्यांनी संताप व चिंता व्यक्त केली आहे. एका नेत्याने सांगितले की, ‘‘हा केवळ आमच्या मुलांवरचा हल्ला नाही, तर आमच्या भविष्यावरचा हल्ला आहे. या हानिकारक केकची विक्री हा केवळ वैयक्तिकदृष्ट्या केवळ कुटुंबांनाच लक्ष्य प्रकार नसून हा हिंदू समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वस्त्राचे धागेदोरे कमकुवत करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान आहे. त्यामुळे आईवडील आपल्या मुलांच्या प्रत्येक हालचालीचे, वागण्या-बोलण्याचे, केेक-मिठाईचे निरीक्षण करीत आहेत आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सावध, सतर्क करीत आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी धार्मिक नेते आणि स्थानिक संघटना मोहिमा राबवत आहेत.
आर्थिक-सामाजिक बहिष्कार
दुसरीकडे, आणि सामाजिक बहिष्कार हे देखील एक असे शक्तिशाली शस्त्र आहे, जे धार्मिक अल्पसंख्याकांना एका टोकावर ठेवते. बांगलादेशातील हिंदू समुदाय आधीच धार्मिक असहिष्णुतेच्या आव्हानांशी झुंज देत आहे यात लक्ष्यित आर्थिक दडपशाहीमुळे झालेली चिंताजनक वाढ परिस्थिती अधिकच गंभीर करणारी आहे. अलीकडील चोरी, जमीन हडप करणे, मालमत्तेचा नाश आणि खंडणी यासारख्या घटना आर्थिकदृष्ट्या अपंग बनवण्याचा नमुना दर्शवतात. यातून केवळ त्यांच्यावर होणारा अन्यायच अधोरेखित होत नाही, तर संस्थात्मक उणिवांवरही प्रकाश टाकतात, ज्यामुळे हिंदू कुटुंबे संकटात सापडली आहेत.
Bangladesh violence : सिराजगंजमधील चोरी आणि विष देण्याच्या घटना हेच दर्शवितात की हिंदू कुटुंबांना दहशतीत ठेवण्यासाठी कट्टरपंथी, जिहादी गुन्हेगार किती नीच पातळी गाठू शकतात. २ नोव्हेंबरच्या रात्री गरदाहा गावात पाच हिंदू कुटुंबांच्या घरांवर नियोजित दरोडा टाकण्यात आला. चोरांनी आधीपासूनच गावातील कूपनलिकेत विष मिसळून ठेवले होते. त्यामुळे हिंदू कुटुंबातील व्यक्ती बेशुद्ध पडल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी घराची तोडफोड झाल्याचे तसेच १० लाख रुपयांची चोरी झाल्याचे पाहिले. ही चोरी केवळ पैसे आणि मौल्यवान करण्यात आलेली नाही, तर हिंदू कुटुंबे सुरक्षित नाहीत, असा स्पष्ट संदेश देण्यासाठीच हे कृत्य करण्यात आले आहे. या घटनेनंतर हिंदू ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचीही भीती वाटू लागली आहे. दुसरीकडे, कॉक्सबाजारमध्ये धर कुटुंबाला जमीन हडपणार्यांविरुद्ध खडतर लढा द्यावा लागला. या कुटुंबाचा दोन दशकांहून अधिक काळ जमिनीवर ताबा होता आणि त्याची कायदेशीर देखील होती. तरीही जिहादी गुन्हेगारांनी धर कुटुंबाला त्यांच्याच भूमीवर राहू देण्यासाठी पैशांची मागणी केली. धर कुटुंबीयांनी पैसे देण्यास नकार दिल्याने गुन्हेगारांनी सीमा भिंत तोडली. या घटनेला अनेक महिने उलटून गेले असले तरी धर कुटुंबीय दहशतीच्या छायेत वावरत आहे.
तसेच १ नोव्हेंबर रोजी राजबाडी येथे एका रात्रीत शेतकरी मितीन बिस्वास ५०० केळीची झाडे तोडण्यात आली होती, ज्यामुळे त्यांचे ५ लाखांचे नुकसान झाले. अशाप्रकारच्या तोडफोडीतून दुहेरी हेतू साध्य होतो. वरवर जरी हे मालमत्तेच्या नुकसानीच्या रूपात दिसून येत असले तरी, अप्रत्यक्षपणे हिंदूंना विस्थापित करून जमिनीवर कब्जा करण्याची ही रणनीती आहे. धर कुटुंबाप्रमाणेच मितीन बिस्वास देखील आपल्या भविष्याविषयी अनिश्चित आणि प्रशासकीय दुर्लक्षाचे ठरले आहेत. त्यांच्या प्रकरणात स्थानिक अधिकार्यांनीही कुठलेही स्वारस्य दाखविले नाही. या घटना जमिनीच्या वादांची एक व्यापक गाथा दर्शवतात, जिथे हिंदू जमीन मालकांना त्यांच्या उपजीविकेपासून पद्धतशीरपणे वंचित ठेवले जाते.
Bangladesh violence : आर्थिक दडपशाही, चोरी आणि जमीन हडपणे हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. ठाकुरगावचा एक हिंदू व्यापारी उत्तम रॉय यांना ५ ऑक्टोबर रोजी खंडणी वसूल करण्याची धमकी देण्यात आली. पत्र लिहून त्यांच्याकडून ६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि जर नकार दिल्यास त्यांच्या मुलाचे १०० तुकडे करण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्या मुलीलाही इजा करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दहशतीत होते. ही घटना हिंदूंवरील लक्ष्यित हिंसाचाराचे कठोर वास्तव अधोरेखित करते. अशा जबरदस्तीने वसुली केवळ पैशांसाठी केली जात नाही, तर अल्पसंख्यक कुटुंबीयांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि त्यांना स्थानिक अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी देखील असले प्रकार करण्यात येतात. हिंदू उद्योगपतींसंबंधित अशा घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा
२०२४ सालाच्या अखेरीस बांगलादेशातील वाढता हिंसाचार तेथील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवतो. संस्थात्मक अन्याय आणि धार्मिक अल्पसंख्यकांकडे, विशेषत: हिंदू समुदायाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दुर्बल घटकांना कायदेशीर संरक्षण देण्यास तेथील सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. जिहादी कट्टरवाद्यांमुळे तेथील हिंदूंमध्ये भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २६ नोव्हेंबर रोजी चितगाव येथे घडलेली घटना. हिंदूंचे शांततापूर्ण सुरू असताना सरकार पुरस्कृत हिंसाचाराने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. चिन्मय प्रभूंच्या सुटकेची मागणी करत आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
Bangladesh violence : मात्र त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी किंवा त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याऐवजी अधिकार्यांनी अप्रमाणित बळाचा वापर केला. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी आंदोलकांवर साऊंड बॉम्ब (साऊंड ग्रेनेड) आणि लाठीचार्ज केला. या बळप्रयोगात विशेषत: महिलांना केवळ शारीरिक हिंसाचाराच नव्हे तर अधिकार्यांकडून शाब्दिक शिवीगाळीचाही सामना करावा लागला. ही घटना देखील धार्मिक अल्पसंख्यकांचे अधिकार दुर्बळ करण्याच्या सरकारी संगनमताच्या व्यापक पॅटर्नचा भाग आहे. चितगाव घटनेच्या काही दिवस आधीच आणखी एका चिंताजनक घटनेने हिंदू समुदायाला धक्का बसला होता. बंदरबनमध्ये रॅपिड अॅक्शन कारवाईत अटक केल्यानंतर प्रतिबंधित अन्सारुल्ला बांगला टीमच्या ३२ दहशतवाद्यांना जमानत देण्यात आली. आपली कट्टरपंथी विचारधारा आणि हिंसक कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या दहशतवाद्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केला होता. मात्र, त्यांच्या सुटकेमुळे बांगलादेशची राष्ट्रीय सुरक्षा पुन्हा धोक्यात तर आली आहेच, शिवाय यामुळे तेथील हिंदूंच्या जिवाला देखील गंभीर स्वरूपाचा निर्माण झाला आहे. किंबहुना, निदर्शनांची हिंसक दडपशाही, धोकादायक जिहादी दहशतवाद्यांची सुटका, खंडणी वसुली आणि संपत्तीच्या नाशाविषयी उदासीनता या सर्व गोष्टी न्याय टिकवून ठेवण्यात प्रणालीगत अपयशाचे संकेत आहेत. जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा व महत्त्वाचा भाग असुरक्षित असतो आणि त्याला सातत्याने लक्ष्य केले जाते तेव्हा न्याय्यपूर्ण आणि न्याय्यसंगत समाजाचे आश्वासन हे दूरचे स्वप्नच बनून राहते.
संस्थांमध्ये पांथिक भेदभाव
बांगलादेशमध्ये पांथिक/धार्मिक भेदभाव हा प्रदीर्घ काळापासूनचा एक वादग्रस्त मुद्दा आहे. शैक्षणिक संस्थांमधील पक्षपात व भेदभावाच्या घटनांसोबतच हिंदू शिक्षक आणि उप-निरीक्षकांना (एसआय) लक्ष्य करून त्यांच्याकडून जबरदस्तीने राजीनामे आणि निलंबनाच्या अलीकडील घटना प्रणालीगत असमानतेचे त्रस्त करणारे चित्र प्रदर्शित करतात. अलीकडच्या काही महिन्यांत मोठ्या संख्येने शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. यामध्ये काझी नजरुल इस्लाम विद्यापीठाचे कुलगुरू सौमित्र शेखर आणि बीयूईटीचे कुलगुरू डॉ. सत्यप्रसाद मजुमदार यांच्यासारख्या नामवंतांसह साथिया पायलट मॉडेल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय कुमार देबनाथ आणि अन्वर खान मॉडर्न नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तापसी भट्टाचार्य यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर खात्यातील अनेक हिंदू उप-निरीक्षकांनाही अशाच पद्धतीने बडतर्फ करण्यात आले आहे. सुशांत रॉय आणि रिपन मंडल यांच्यासह शंभरहून अधिक लोक याचे बळी ठरले आहेत.
Bangladesh violence : त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पसंख्यक विद्यार्थ्यांनाही भेदभावाचा सामना करावा लागत आहे. चितगाव मेडिकल कॉलेज (सीएमसी) मधील अनेक हिंदू विद्यार्थ्यांना कथित राजकीय संबंधांमुळे काढून टाकण्यात आले. प्रशासनानेही ही आवश्यक असल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांवरील ही कारवाई म्हणजे राजकीय माध्यमातून हिंदूंचा असंतोष दुर्लक्षित करण्याचा व त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे. दुसरीकडे, सिल्हेटमधील कनाई घाट सरकारी महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थ्यांपेक्षा हिंदू विद्यार्थ्यांकडून अधिक प्रवेश शुल्काची मागणी करण्यात आली. मात्र, हिंदूंच्या प्रखर विरोधामुळे धोरणात सुधारणा करावी लागली.
Bangladesh violence : त्याचप्रमाणे आधीपासूनच हल्ल्यांचा सामना करीत असलेल्या यांना तोंड देत असलेल्या चिओरिया, तुलाबरिया आणि कालीदहच्या पूरग्रस्त भागातील हिंदूंना तसेच वार्यावर सोडून देण्यात आले. नोआखली आणि बारिसाल ही गावे अलिप्त आणि दुर्लक्षित राहिली. ‘आम्हाला मदत सामग्री देण्यासाठी कोणीही आले नाही’, असे एका हिंदूने अतिशय दुःखाने सांगितले. पूरग्रस्त भागात अनेक आठवड्यांपासून हिंदू मदतीच्या आशेने होते. आसपासच्या भागातून जाणारे मदतीचे ट्रक या गावांच्या सीमेवर येताच गायब होऊन जातात.
Bangladesh violence : एकूणच या घटनांमध्ये खूप सखोल अर्थ दडला आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होणार्या हल्ल्यांकडे केवळ भौतिक, शारीरिक हानी किंवा संपत्तीचे नुकसान या दृष्टिकोनातून पाहू नये, तर हा त्यांच्या अस्मितेवर, श्रद्धेवर आणि अस्तित्वावरच झालेला हल्ला आहे. न्यायपालिका, अंमलबजावणी करणारी यंत्रणा व शासन-प्रशासनाचे मौन, निष्क्रियता अथवा मौन स्वीकृतीमुळे बांगलादेशात अल्पसंख्यकांवर जे अत्याचार होत आहेत, ते यांच्या संगनमतानेच होत आहेत, असा स्पष्ट निष्कर्ष निघतो. बांगलादेशातील जिहादी दहशतवादाच्या वाढत्या लाटांना आळा घातला नाही, तर हिंदूंना तेथे क्षणभरही जगणे कठीण होईल.
(पांचजन्यवरून साभार)