पुलगावातील रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या

20 Dec 2024 19:39:23
तभा वृत्तसेवा
देवळी, 
Rajesh Bakane : देवळी मतदार संघात पुलगाव येथे ग्रामीण रुग्णालय आहे. पुलगाव मोठे शहर आहे. देवळी मतदार संघातील पुलगाव हे मोठे शहर असुन वर्धा परिसरातील 40 ते 50 तर अमरावती जिल्ह्यातील नागरिक येथे उपचारासाठी येतात. येथे येणार्‍या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आ. राजेश बकाने यांनी आज 20 रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून केला.
 
 
 
BAKANE
 
 
 
पुलगाव शहराला लागून नाचणगाव मोठे गाव आहे. अमरावती जिल्ह्यातील 20 ते 25 तर पुलगाव शहराला 40 ते 50 गावे लागून आहेत. या गावामधून मोठ्या प्रमाणात रुग्ण ग्रामीण रुग्णालयात येतात. पुलगावला अप्पर तहसीलचा दर्जा मिळाला आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारतसुद्धा तयार आहे. केवळ काही पदं भरावी लागतील. देवळी येथून सावंगी आणि वर्धा हे 40 किलोमीटर आहे. येथुन रुग्ण सावंगी, सेवाग्राम किंवा वर्धा येथे नेताना गरिबांची अडचण होत असल्याने येथील रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी केली.
 
 
याशिवाय देवळी आणि पुलगाव दोन नगर परिषद आहे. या दोन्ही नगर परिषदांच्या विकासासाठी नगर विकास निधीची गरज आहे. जलतरण तलाव, नाट्यगृह, वाचनालय, चौकांचे सौंदर्यीकरण, स्मशानभूमी याकरिता निधी पाहिजे. 25 वर्षांपासून हा मतदार संघ वंचित राहिला आहे. नाचणगाव ग्रापं मधील काही वार्ड पुलगाव नपला लागून आहेत. त्याचा बीपी प्लॅन सुधारित आम्ही बनवित आहे. त्याची मंजुरीसुद्धा देण्यात यावी, अशी मागणीही आ. बकाने यांनी विधानसभेत केली.
Powered By Sangraha 9.0