खा. संजय राऊत यांच्या बंगल्याची रेकी

20 Dec 2024 17:39:25
- भांडुप पोलिसात तक्रार दाखल
 
मुंबई, 
Sanjay Raut : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या बंगल्याची दोन अज्ञातांनी रेकी केल्याची धक्कादायक समोर आली आहे. हे दोघेही मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी राऊत यांच्या बंगल्याचे फोटोही काढले. त्यांच्याजवळ १० मोबाईल फोन होते. बंगल्यातील सुरक्षा कर्मचार्‍यांनी भांडुप पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
 
 
Sanjay Raut
 
Sanjay Raut  : खासदार संजय राऊत आणि त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांच्या बाबतीत ही गंभीर घटना आली. सकाळी ९.३० च्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्याची दोन अज्ञातांकडून रेकी करण्यात आली. संजय राऊत यांच्या बंगल्याच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन दुचाकीस्वार त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला आले आणि बंगल्याचे फोटो काढले.
 
यापूर्वी तीन वेळा रेकी
Sanjay Raut  : राऊतांच्या बंगल्याच्या रेकीचा प्रकार घडल्यानंतर स्थानिक चौकशी करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राऊत यांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. आता केवळ एक काँन्सटेबल त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो. संजय राऊत यांनीदेखील याबाबत खुलासा केला की, असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. या आधीही तीन वेळा रेकी करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0