राजेंद्र हायस्कूलने पोदारला हरविले

    दिनांक :21-Dec-2024
Total Views |
- एस.ए.रहीम (अंडर-१५) एकदिवसीय आंतर-शालेय क्रिकेट
 
नागपूर, 
Rajendra High School : विदर्भ क्रिकेट एस.ए.रहीम (अंडर-१५) एकदिवसीय आंतर-शालेय क्रिकेट सामन्यात आज राजेंद्र हायस्कूलने पोदार इंटरनॅशनल शाळेचा ६ गड्यांनी पराभव केला. गुरुनानक फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सामना खेळला गेला. पोदार शाळेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ५ गडी बाद करून २२९ धावा केल्या.
 
 
rajendra-highschool
 
Rajendra High School : नागेश उमाळे याने १४८ चेंडूत ९१ धावा ठोकल्या. त्यात ९ होते. दुसर्‍या विकेटसाठी त्याची ११६ धावांची भागीदारी झाली. मल्हार धुरड याने ७१ चेंडूत ६५ धावा काढल्या त्यात ९ चौकार व १ षटकार आहेत. आर्यकुमार याने ३८ धावा काढल्या. राजेंद्र हायस्कूलतर्फे अरिझ खान याने ४३ धावात देत ३ गडी बाद केले. ५३.५ षटकात राजेंद्रतर्फे ४ गडी बाद २३२ धावसंख्या आरामात करीत सामना जिंकला. त्यात फलंदाजीत कुंवर बावनकर ५२, प्रियांशू जाचक ८४ तर आर्यन दास ४३ वर नाबाद राहिला. अशारितीने राजेंद्र हायस्कूलचा क्रिकेट संघ ६ गड्यांनी विजयी ठरला.