सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व!

21 Dec 2024 06:00:00
थेट विधिमंडळातून
- नागेश दाचेवार
दुसर्‍यांच्या शेतात सालकरी गडी म्हणून, मोलमजुरी करून आयुष्य घालवणार्‍या शेतमजूर असलेल्या शंकरराव शिंदे गरीब कुटुंबातील, धनगर समाजातील एक पोर आता राज्याच्या सर्वोच्च सभागृहाचा प्रमुख झालाय्!... त्याचं नाव आहे Ram Shinde प्रा. राम शिंदे... अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जडघडण झालेल्या, चौंडी विकास प्रकल्पाचे सदस्य, सरपंच ते आमदार असा प्रवास असणार्‍या राम शिंदेंची आता विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाली आहे. हेही वाचा : भयानक...हवेत उडणारे पक्ष हवेतच जळाले...
 
 
ram-shinde-20dec2024
 
 
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज. मंत्री, आमदार, प्राध्यापक Ram Shinde राम शिंदे या संघर्षवीराचा जन्म अहल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्याच्या चौंडी या अत्यंत छोट्याशा अर्थात त्याकाळी दोन पाचशे लोकसंख्या असलेल्या आणि आजही दोन, चार हजारापलीकडे लोकसंख्या नसलेल्या गावी १ जानेवारी १९६७ रोजी शेतमजूर असलेल्या शंकरराव शिंदे यांच्या घरी झाला. घरातलं अठराविश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबाचा हा एक प्रश्न उभा ठाकला असताना, घरच्या परिस्थितीवर मात करत राम शिंदे यांनी उच्च शिक्षण घेतले. एम.एस्सी., बी.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका महाविद्यालयात सुरुवातीच्या काळात १९९२-९३ मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. दरम्यान, १९९५ मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त चौंडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी चौंडी विकास प्रकल्पाचा पाया ठेवला. आणि या प्रकल्पानेच महाराष्ट्राला दिला चौंडीच्या मातीतील हा हिरा... हेही वाचा : धक्कादायक...मृतदेह गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करून पाठविले!
 
 
Ram Shinde : पण हा प्रवास राम शिंदेंसाठी काही सोपा नव्हता. चौंडी विकास प्रकल्पासाठी नोकरी सोडून स्वतःला वाहून घेतले. त्यानंतर १९९७ साली भाजपाने पंचायत लढविण्याची संधी शिंदेंना दिली. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला, यश मिळू शकले नाही. तब्बल तीन वर्षांनंतर २००० साली चौंडी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत मात्र यश मिळाले. त्यानंतर सलग पाच वर्षे ते सरपंच राहिले. पण यादरम्यान, लढविलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव झाला. नंतर जिल्हा परिषदेचं तिकीट कापलं गेलं. आणि त्यापाठोपाठ मध्ये ग्राम पंचायतीतदेखील पराभवाला सामोरे जावे लागले. राजकारणात उतरती कळा लागल्याचे वाटू लागले असताना, २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत राम शिंदे यांच्या पत्नी आशाताई शिंदे या विजयी झाल्याने, शिंदेंना थोडासा दिलासा मिळाला. या राजकीय खडतर प्रवासादरम्यान, राम शिंदेंनी २००४ ते २००६ भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, २००६ ते २००९ जामखेडचे तालुकाध्यक्ष, अशा जबाबदार्‍या निभावल्या. त्यानंतर भाजपाने २००९ साली शिंदे यांना नव्याने तयार झालेल्या कर्जत-जामखेड या विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दिली आणि प्रा. राम शिंदे यांचा विधानसभेत विजय होऊन, राज्याच्या राजकारणात उदय झाला. हेही वाचा : नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के!
 
 
 
विरोधात असतानादेखील या भागात केलेल्या विकास कामांच्या जोरावर राम शिंदे २०१४ च्या विधानसभेतदेखील सलग दुसर्‍यांदा मोठ्या फरकाने झाले. २०१४ मध्ये महायुती सरकार महाराष्ट्रात आलं. या सरकारमध्ये २०१४-२०१६ या काळात गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी शिंदेंनी सांभाळली. यावेळी त्यांनी एक जागरूक गृहराज्यमंत्री म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यापाठोपाठ सन २०१६-२०१९ या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्त्रोेद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून बढती झाली. याच दरम्यान त्यांनी संघटनात्मक जबाबदार्‍यादेखील पार पाडल्या. २०१० ते २०१२ अहल्यानगर जिल्हाध्यक्ष, २०१३ ते २०१५ भाजपाचे राज्याचे सरचिटणीस, २०२१ प्रदेश उपाध्यक्ष, २०२२ भाजपा कोअर कमिटी सदस्य म्हणून प्रभावी काम केले. बर्‍याच काळानंतर राम शिंदेंना पुन्हा एकदा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव झाल्यानंतर शिंदे पक्षाने विधान परिषदेवर पाठविले. दरम्यान, शिंदे विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी २०२४ ची विधानसभा लढविली मात्र, त्यात देखील अपयश आले. मात्र, आपल्या कर्तृत्वाचा ठसा तर त्यांनी आधीच उमटवला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या १९ व्या सभापतिपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. पक्षाने विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाच्या सभापतिपदी करत एका सामान्य कुटुंबातल्या उच्चशिक्षित व्यक्तीचा सन्मान केला. राम शिंदे हे पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज, परिवारातील सदस्य, अर्थात अहल्यादेवींचे वडील मानकोजी शिंदे यांच्या नवव्या पिढीतील वारसदाराच्या रूपानं, राजमाता, राष्ट्रमाता अहल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या वर्षी या सर्वोच्चपदावर बसले आहेत. हा एकप्रकारे अहल्यादेवींचाच सन्मान असल्याची भावना आता केली जात आहे.
 
 
Ram Shinde : राम शिंदे यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने आणि त्यांच्या खडतर प्रवासाच्या निमित्ताने सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसं घडतं याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळालं. आता सभागृहाला, सभागृहातील सदस्यांना आणि त्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय देण्याची मोठी जबाबदारी राम शिंदेंच्या खांद्यावर आली आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवींचे वारस म्हणून अहल्यादेवींचा जो होता, त्याच बाण्याने काम करत या महाराष्ट्रााला विकसित महाराष्ट्राकडे नेण्याचा शिवधनुष्य पेलायचा आहे. 
 
- ९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0