कबड्डी खेळातून करिअर घडविण्याची प्रेरणा मिळते

21 Dec 2024 17:52:11
वाकडी (नवीन) येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन
गडचिरोली, 
कबड्डी हा सांघिक खेळ असून तो युवकांमध्ये kabaddi एकजूट आणि शारीरिकkabaddi सुदृढता वाढवतो. तरुणांनी अशा मैदानी खेळांमध्ये उस्फूर्त सहभाग घ्यावा. खेळासोबतच शारीरिक आरोग्याला प्राधान्य द्या आणि शिक्षणाकडेही लक्ष द्या. कबड्डी हा खेळ ग्रामीण भागात आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवकांना क्रीडाविषयीची आवड निर्माण होते आणि करिअर घडवण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी केले.
  

kabaddi  
 
 
चामोर्शी kabaddi  तालुक्यातील वाकडी (नवीन) येथील जय शिवराय क्रीडा मंडळाच्यावतीने मामा तलाव परिसरात दिवस-रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, अमोल मंगर, कुडवे, दुधे, सोरते, प्रकाश मेश्राम, मंडळाचे अध्यक्ष वैभव सोमनकर, सुरेश बारसागडे, विमला मडावी आदी उपस्थित होते.
 
 
छत्रपती शिवाजी kabaddi  महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर फित कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील कबड्डी संघाचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान माजी खासदार नेते यांनी गावातील समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक विचार मांडत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. याप्रसंगी गावातील नागरिक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0