देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर,
कारागृहात शिक्षा भोगत tracking to be installed in jails असलेल्या कैद्यांना काही दिवसांसाठी रजेवर येण्याची मुभा असते. मात्र अनेकदा फर्लो व पॅरोल अंतर्गत रजा मिळताच बंदी पसार होऊन जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा फरार कैद्यांच्या शोधासाठी पोलिस यंत्रणेला शोध घेण्यासाठी बरीच धावपळ होते. हा प्रकार टाळण्यासाठी कैद्यांवर डिजिटल वॉच ठेवण्यात येईल. रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यांचे ट्रॅकिंग करणारी यंत्रणा कारागृहात उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या tracking to be installed in jails अखेरच्या दिवशी शनिवारी कारागृहे व सुधारसेवा विधेयक मंजूर करण्यात आले. चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मोबाईल आढळून आले आहे. कैद्यांना भेटायला येणार्यांचे ट्रॅकिंग करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. कारागृहातील हा प्रकार टाळण्यासाठी नवनवीन सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. अनेक गैरप्रकार कारागृहात चालतात. अशा सर्व प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा उपयोग केल्या जाणार आहे. याशिवाय कारागृह हे खर्या अर्थाने करेक्शनल होम (सुधारात्मक घर) व्हावी, असाच होणार आहे.
आदर्श बालसुधारगृह होणार
देशातील एकमेव आदर्श बालसुधारगृह tracking to be installed in jails मुंबईत तयार करण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला याबाबतची जबाबदारी दिली होती. मात्र गत पाच वर्षांपासून आदर्श बालसुधारगृहाचा प्रश्न प्रलंबित होता. बालसुधारगृहासाठी करेक्शनल होम कसे असावेत,यासाठी २०१८ साली कैलास सत्यार्थी यांच्या चमूने एक अहवाल तयार होता. त्याचा पाठपुरावा करून आता आदर्श बालसुधारगृह तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बहुमजली कारागृहे बांधणार
या tracking to be installed in jails विधेयकात अनेक चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मुंबई सारख्या शहरात जागेअभावी आता बहुमजली कारागृहे बांधण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व कारागृहांचे संगणकीकरणासह आधुनिकीकरणाला प्राधान्यक्रम दिल्या जाणार आहे. याशिवाय कारागृह प्रशासनासाठी वेलफेअर स्थापन करणार असून या पैश्यातून अनेक कामे होणार आहे. मानवाधिकार कायद्यानुसार कारागृह कायद्यात बदल केल्या जाईल. तसेच कैद्यांचे न्यायालयीन, दिवाणी, शिक्षाबंदी वर्गीकरण केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
कारागृहात जायचे असल्यास मला सांगा
या विधेयकाच्या tracking to be installed in jails चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी बाकावर बसलेल्या सदस्यांचे चिमटे चर्चेदरम्यान ते म्हणाले, जर काय कुणाला कारागृहात जायचे असल्यास मला सांगा, असे म्हणत त्यांनी मिलींद नार्वेकर यांच्यावर भाष्य केले. मिलींद नार्वेकर तुम्हाला कुठल्या तुरुंगात जायचे आहे, असा थेट प्रश्न करीत तुम्ही सांगाल ते कारागृह दाखवायला नेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.