- मानधन वाढीच्या मागणीसाठी विधिमंडळावर धडक
नागपूर,
मानधनात वाढ winter session 2024 करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी शाहिरांसह लोककलाकारांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. शनिवारी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धडकलेल्या मोर्चात महिला-पुरुष कलावंतांनी भजन, पोवाडा सादर करून साèयांचे लक्ष वेधून घेतले. प्रलंबित मागण्यांसाठी राजेंद्र बावनकुळे, डॉ. संजय बजाज, ज्ञानेश्वर वांढरे, गणेश देशमुख, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, चिरकूट पुंडेकर आणि योगिता नंदनवार यांच्या नेतृत्वात यशवंत स्टेडियम येथून काढण्यात आलेला हा मोर्चा टेकडी मार्गावर थांबविण्यात आला.
यावेळी winter session 2024 अरुणा बावनकुळे, विमल शिवारे, कल्पना बावने, अनिता मेंढेकर आणि बेबी धुर्वे यांनी टाळ-मृदुंगाच्या तालावर भजनाच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडल्या, तर मधुकर शिंदे, मेश्राम यांनी शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करून लक्ष वेधले. शाहिरांसह लोककलाकारांनी भजन, पोवाडा, भारूड, दंडार, डाहाका आणि लावणी आदी प्रकार सादर केले. देशात अनेक शतकांपासून भजन, पोवाडा सादर करण्याची परंपरा आजही कायम आहे. खèया अर्थाने या कलावंतांनी ही कला जोपासत अन्याय, अत्याचाराला वाचा फोडली. तसेच समाजात जनजागृतीचे काम केले. मात्र, कला जिवंत ठेवणाèया कलावंतांना तुटपुंज्या मानधनात कुटुंब चालवावे लागते. राज्य सरकारने कलावंतांच्या मानधनात वाढ करून पाच हजार रुपये केले, तर केंद्र सरकारने सहा हजारावरून एक हजार रुपये मानधन केले. हा कलावंतांचा केलेला अन्याय व अपमान आहे. तो दूर करण्यासाठी मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच winter session 2024 मानधनासाठी राज्य सरकारची वयोमर्यादा 50, तर केंद्र सरकारची 60 आहे. ही वयोमर्यादा सुध्दा कमी करण्यात यावी. कारण अनेक कलावंतांचा मानधनाच्या प्रतीक्षेत मृत्यू झाला आहे. केलेच्या माध्यमातून आयुष्यभर समाज जागविणाèया या कलावंतांना मानधनाचासुध्दा लाभ घेता आलेला नाही, अशी खंतही अनेक कलावंतानी यावेळी व्यक्त केली. राजेंद्र बावनकुळे, ज्ञानेश्वर वांढरे, भगवान लांजेवार, योगिता नंदनवार, नरहरी वासनिक यांच्या शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन स्वीकारत नामदार सावे यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.