- ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल परत
नागपूर,
Central Railway Nagpur मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून गत तीन वर्षात रेल्वे प्रशासनाची ५३ लाख रुपयांची संपत्ती चोरी झाली आहे. मात्र, रेल्वे सुरक्षा बलाने चोरी गेलेल्या संपत्तीचा शोध घेऊन ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळविला आहे. ही बाब अभय कोलारकर माहिती अधिकारांतर्गत प्राप्त झाली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे रूळ, लहान आणि मोठी व इतर विकासकामाच्या ठिकाणी रेल्वेचे साहित्य पडून असते. चोरटे ही संधी साधत आपला डाव साधता. त्यामुळे वर्ष २०२२ ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत रेल्वेची एकूण ५३ लाख ६३ हजार ८०७ रुपयांची संपत्ती चोरीला गेली.
Central Railway Nagpur आरपीएफने शोध राबवून ५२ लाख ५१ हजार ६११ रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविला. केवळ लाख १२ हजार १९६ रुपयांचा मुद्देमाल आरपीएफला परत मिळविता आला नाही. वर्ष २०२२ मध्ये ९ लाख ४ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला. तेवढाच मुद्देमाल आरपीएफने परत मिळविला. तर वर्ष २०२३ मध्ये १५ लाख १२ हजार रुपयांची संपत्ती चोरी झाली होती. त्यातून आरपीएफला १४ लाख ४६ हजार ७०२ संपत्ती परत मिळविण्यात यश आले. तर जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत २९ लाख ४६ हजार ७२४ रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला. आरपीएफने यंदा तपासाचे चक्रे गतीने फिरवून २९ लाख रुपयांचा मुद्देमाल परत मिळविला. रेल्वेच्या चोरी होणारा मुद्देमाल परत होत असल्याने रेल्वेचे फारसे नुकसान झाले नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले.