नागपूरकरांना ‘विशाल’ आनंद

22 Dec 2024 21:56:48
- खासदार सांस्कृतिक महाेत्सवाचा हाऊसफुल्‍ल गर्दीचा दहावा दिवस, विशाल मिश्राच्या काॅन्सर्टने रिझविले
 
नागपूर, 
Khasdar Sanskrutik Mahotsav क्या मुझे प्यार है, वाे बरसात.......तुम्हारा दिल या हमारा दिल, काेई इतना खूबसुरत कैसे हाे सकता है, गायक केकेचे ‘मैं चाहू तुझकाे बेपनाह....’, अशी लाेकप्रिय गाणी ताे गाऊ लागला आणि त्याच्या साेबत रसिकही गाऊ लागले. गायक, संगीतकार, युवकांमध्ये अत्यंत लाेकप्रिय असलेल्या विशाल मिश्राच्या ‘लाईव्‍ह इन काॅन्‍सर्ट’ने आज परिसर दणाणून गेला. माेबाईल ट्राॅचवर लाईटवर नागपूरकर चक्क डाेलत हाेते. खासदार सांस्कृतिक महाेत्सवाच्या दहाव्या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक, संगीतकार विशाल मिश्रा यांची ‘लाईव्‍ह इन काॅन्‍सर्ट’ पार पडली.
 
 
vishal-1
 
नागपूरकरांनी खूप प्रेम दिले, येथे आलाे की आपल्या घरी आल्यासारखे वाटते, खूप दिवसानंतर मला इतके छान वाटते आहे, असे म्हणत विशाल मिश्राने कबीर सिंग चित्रपटातील ‘पहला पहला प्यार है तेरा’ हे गीत सादर केले. धिम धीम ताना ना, की पहली बार माेहब्बत की है, अंबर सरिया, आप प्यार में हम सवरने लगे अशी अनेक गीते सादर केली. विशाल ने ‘आज गली गली अवध सजायेंगे ः राम आयेंगे.... ‘ हे भजन गाताना त्याने जाेडे बाजूला काढून ठेवले, तसेच मराठी गीत ‘मागू कसा मी...’ हे विशेष!
 
 
Khasdar Sanskrutik Mahotsav तत्पूर्वी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्‍या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्र सिंगल, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, राष्ट— सेविका समितींच्या विभाग संपर्कप्रमुख वसुधा खटी, ‘वर्ल्ड रेकाॅर्डस बुक ऑ\ इंडिया’च्या संपादिका सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर, रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदटन करण्यात आले.
 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
सायंकाळी 6 वाजताच ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण पूर्णतः भरून गेले हाेते. त्यामुळे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. पटांगणच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनवर सुरू असलेल्या तसेच, विविध साेशल माध्यमावरील लाईव्ह कार्यक्रमाच्या हजाराे प्रेक्षकांनी आस्वाद घेतला.
 
 
ढाेलताशा वादनाने दणाणला परिसर:
स्‍थानिक ‘कलावंत’ या ढाेलताशा पथकाच्या वादकानी सादर केलेल्या ढाेलताशा वादनाने व जय भवानी, जय शिवाजी महाराजांच्या घाेषाने परिसर दणाणून गेला.
 
 
 
संस्कार यज्ञ यशस्वी - नितीन गडकरी
- दाेन विश्वविक्रमांची झाली नाेंद
175 शाळांमधील तब्‍बल 28,329 विद्यार्थ्यांनी समर्थ स्‍वामी रामदासांचे 51 ‘मनाचे श्लाेकां’चे पठण आणि वंदे मातरम गायन केले. त्याची जागतिक स्तरावर विश्वविक्रमांच्या रुपात दखल घेण्यात आली. त्यामुळे हा संस्कार यज्ञ यशस्वी झाला, असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढले.
Khasdar Sanskrutik Mahotsav खासदार सांस्कृतिक महाेत्सव अंतर्गत आयाेजित जागर भक्तीचा या उपक्रमात शुक्रवारी 20 डिसेंबर राेजी सकाळी शहरातील 175 शाळांमधील तब्‍बल 28,329 विद्यार्थ्‍यांनी समर्थ स्‍वामी रामदासांचे 51 ‘मनाचे श्लाेकां’चे पठन आणि राष्ट— सेविका समितींच्या सहकार्याने वंदे मातरम चे गायन करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या दाेन्‍ही विक्रमाची ‘वर्ल्ड रेकाॅर्डसब बुक ऑफ इंडिया’ मध्‍ये नाेंद करण्‍यात आली. या दाेन्ही विक्रमांचे प्रमाणपत्र व मेडल ‘वर्ल्ड रेकाॅर्डसब बुक ऑफ इंडिया’च्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर, रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार यांच्या हस्ते नितीन गडकरी, वसुधा खटी यांना प्रदान करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0