- एसजेएएन-रायसाेनी अचिव्हर्स पुरस्कार साेहळा
नागपूर,
Raisoni Achievers award ceremony खेळांमुळे चांगले व्यक्ति घडण्यास मदत हाेते व सामाजिक स्वास्थ्य टिकून राहते, असे प्रतिपादन द्राेणाचार्य पुरस्कार प्राप्त व महिला हाॅकीचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी एसजेएएन-रायसाेनी अचिव्हर्स पुरस्कार साेहळ्यात बाेलत हाेते. मुलांना उपदेश देताना ते म्हणाले की," माेबाईलच्या जमान्यात मैदानावर मुले दिसत नाही, पालकांनी त्यांना मैदानावर खेळावयास पाठवणे आवश्यक आहे. किमान 4 तास खेळ आवश्यक करावे", असा सल्ला दिला.
Raisoni Achievers award ceremony सिव्हिल लाईन्सच्या प्रेस क्लबच्या कॉन्फरेन्स हाॅलमध्ये झालेल्या कार्यक्रमात साऊथ पाॅईंट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, ग्लाेबल एज्युकेशन लि.चे आदित्य भंडारी, डाॅ. मृणाल नाईक उपस्थित हाेते. यावेळी नागपुरातील खेळाडू, क्रीडा शिक्षक व क्रीडा पत्रकार उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ पत्रकार डाॅ. राम ठाकूर यांनी केले. आभार प्रदर्शन एसजेएनचे उपाध्यक्ष अमित संपत यांनी केले.
नयन, हिमांशी, अक्षय, दिव्या सम्मानित
Raisoni Achievers award ceremony कार्यक्रमात कनिष्ठ पुरूष गटात आंतरराष्ट्रीय एथलीट नयन सरडे व महिलांमध्ये राष्ट्रीय हाॅकी खेळाडू हिमांश गावंडे यांना सन्मनित करण्यात आले. ज्येष्ठ गटात विदर्भ रणजीचा कर्णधार अक्षय वाडकर व नागपूरची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. सेंटर पाईंट शाळा (दाभा), व सीपी अँड बेरार महाविद्यालय, महाल यांना पुरस्कार देण्यात आला.