एसटीच्या प्रवाशांची आर्थिक लूट थांबणार

22 Dec 2024 21:52:16
- एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले
 
नागपूर, 
ST passengers राज्य महामंडळाच्या लांबपल्ल्याच्या अनेक बसेस महामार्गालगत असलेल्या हॉटेलसमोर उभ्या केल्या जातात. एसटीचे चालक - वाहकांना हॉटेलच्या मालकांकडून नि:शुल्क खाद्यपदार्थ पुरविल्या जात असल्यामुळे महामार्गालगत एसटी उभ्या केल्या जातात. मात्र आता असे करता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दात इशारा एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिला आहे. हिवाळी अधिवेशन काळात पत्रकारांशी बोलताना की, यासंदर्भात एक आदेश काढल्या जाणार आहे. त्यामुळे खासगी हॉटेलसमोर बस थांबणार नाही.
 
 
ST passengers
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
ST passengers एसटीच्या चालक - वाहकांना खाजगी हॉटेलसमोर थांबविण्याची गरज नसताना थांबविल्या जातात. प्रवाशांना असा अनुभव लांबपल्ल्याच्या बस प्रवास करताना येतो. हॉटेलसमोर एसटी बस थांबविल्यानंतर चालक वाहक प्रवाशांना सुचना करतो की, येथे दहा मिनिट बस थांबणार असून प्रवाशांनो चहा-नाश्ता करायचा असेल तर करून घ्या. अशावेळी स्वाभाविकपणे एसटीचे प्रवासी हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारतो. एसटीच्या प्रवाशांना मनमानी पद्धतीने खाण्यापिण्याच्या चीजवस्तू विकण्याच्या प्रकाराला चाप बसविण्यासाठी एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी योग्य निर्णय घेत प्रवाशांना दिलासा दिला आहे. महामार्गावरील हॉटेल्समध्ये एक प्लेट समोसा, आलुबोंडा घेतला तर चाळीस ते पन्नास रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त आकारला जातो. अशाप्रकारे प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.
 
Powered By Sangraha 9.0