श्रीसारदादेवी यांची जयंती उत्साहात

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
-रामकृष्ण मठात विविध कार्यक्रम

नागपूर, 
Sri SaradaDevi jayanti : श्रीरामकृष्ण परमहंस यांची सहधर्मचारिणी, स्वामी विवेकानंदांदी गुरुबंधूंची गुरुमाता आणि रामकृष्ण संघाची जननी म्हणून ओळखल्या जाणार्‍या माताजी श्रीसारदादेवी यांची १७२वी जयंती धंतोलीमधील रामकृष्ण मठात मोठ्या उत्साहात पार पडली. परमाराध्या श्री माँ सारदादेवी यांना त्यांचे लक्षावधी भक्त माताजी म्हणून ओळखतात. जन्म २२ डिसेंबर १८५३ रोजी झाला. त्यांचे ऐहिक जीवनातील चिंता व काळजी यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि चिरंतन शांतीसाठी व्यथितहृदय मानवांना त्यांचे चरण म्हणजे सांत्वनाप्राप्तीचे एख सुनिश्चित स्थान बनले होते.
 
 
shardadevi
 
Sri SaradaDevi jayanti : तिन्हीत्रिकाळ आणि सदासर्वकाळ त्यांच्याकडे स्त्री-पुरुषांची रीघ लागलेली असे. आत्यंतिक ओढगस्तीत सापडलेल्या त्यांच्या तळमळत्या जीवांना माताजींचे अमर आशीर्वाद लाभत असत. नागपुरातील पाच वाजता मंगलआरती झाली व वैदिक सूक्तांचे पठण करण्यात आले. सकाळी एका विशेष पूजेचे आणि होमाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. नैवेद्यादी दाखवून समस्त भक्तांना भोजनप्रसाद वाटप करण्यात आला. दरम्यान सुमधुर भक्तिगीते सादर करण्यात आली. संध्याकाळच्या वेळी मातृनाम संकीर्तन आणि भजनांचा कार्यक्रम झाला. सुमारे पंधराशे भक्तांनी मठात येऊन जप-ध्यान तसेच करून येथील प्रसन्न, ध्यानप्रवण वातावरणाचा लाभ घेतला व उत्सवात सहभागी झाले. या औचित्यावर श्रीरामकृष्ण-विवेकानंद साहित्यावर विशेष सवलतदेखील देण्यात आली.