- कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअस
- किमान ११.८ अंश सेल्सिअसवर
नागपूर,
Temperature in Nagpur किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात गोठवणार्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत होत्या. गत दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला असून कमाल तापमान २९.४ अंश सेल्सिअस किमान ११.८ अंश सेल्सिअसवर आहे. शुक्रवारी नागपुरात तापमान १६ अंश सेल्सिअसवर पोहचले होते. तर रविवारी पुन्हा कमी होत ११.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. डिसेंबरच्या पूर्वार्धात कडाक्याची थंडी होती. मात्र आता थंडीचा जोर आणखी ओसरणार असून पावसाची शक्यता वर्तवली हवामान विभागाने वर्तवली आहे.
Temperature in Nagpur हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला नागपुरात सात अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले होते. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम विदर्भाच्या तापमानावर होणार असून विदर्भात येत्या २४ व २५ डिसेंबरला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आली आहे. तर काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला ब्रेक मिळणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.