मुस्लिमबहुल भागात सापडलेले मंदिर, 1992 पासून होते निर्जन

22 Dec 2024 10:22:53
बुलंदशहर, 
Temple found in Bulandshahr उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एक प्राचीन मंदिर सापडले आहे. हे मंदिर मुस्लिमबहुल परिसरात सापडले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराची स्वच्छता करून एडीएम अभिषेक सिंह यांना निवेदन दिले. हे मंदिर खुर्जा कोतवाली नगर परिसरातील सलमा हकन परिसरात आहे. बुलंदशहरमध्ये 1992 मध्ये दंगल झाली होती. या काळात या परिसरात राहणारे हिंदू लोक स्थलांतरित झाले होते. 1992 मध्ये हिंदू लोकांनी परिसर सोडल्यानंतर हे मंदिर ओसाड पडले होते. तब्बल 42 वर्षांनंतर या मंदिराची स्वच्छता करण्यात आली आहे. आता पुन्हा इथे पूजा सुरू होऊ शकते.
 हेही वाचा : काँगोच्या बुसिरा नदीत बोट उलटली, ख्रिसमससाठी घरी जाणाऱ्या 38 जणांचा मृत्यू

Temple found in Bulandshahr
 
 
बुलंदशहरच्या आधी उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एक प्राचीन मंदिर सापडले होते. हे मंदिर सापडल्यानंतर इतर शहरातील पडक्या मंदिरांचाही शोध सुरू झाला. कानपूरच्या महापौर स्वतः मंदिराच्या शोधासाठी निघाल्या होत्या. न भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) पथकाने शनिवारी 'कल्की विष्णू' मंदिर परिसरात जुन्या विहिरीची पाहणी केली. याच्या एक दिवस आधी एएसआयने जिल्ह्यातील नुकत्याच सापडलेल्या मंदिराचे सर्वेक्षण केले होते. प्राचीन 'कल्की विष्णू' मंदिराचे पंडित महेंद्र प्रसाद शर्मा म्हणाले की, पाहणी पथक येथे आले आहे ही चांगली गोष्ट आहे. Temple found in Bulandshahr शर्मा म्हणाले, "येथे एक 'कृष कुपा' (विहीर) आहे. ती बंद नाही, पण त्यात पाणी नाही. या विहिरीचे वर्णन स्कंद पुराणातही आहे, संभळातील सर्व तीर्थक्षेत्रांचे वर्णन स्कंदात आहे. ही विहीर मंदिर परिसराच्या आत आहे, ती जुन्या हद्दीत होती."
 हेही वाचा : जयपूर अग्निकांडमध्ये माजी आयएएस करणी सिंग यांचा मृत्यू, मुलींच्या डीएनए नमुन्यांनी पुष्टी
 
संभल जिल्ह्यातील 46 वर्षे बंद राहिल्यानंतर गेल्या आठवड्यात उघडण्यात आलेल्या भस्मा शंकर मंदिराच्या विहिरीत तीन खंडित मूर्ती सापडल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले होते. Temple found in Bulandshahr श्री कार्तिक महादेव मंदिर (भस्म शंकर मंदिर) 13 डिसेंबर रोजी पुन्हा उघडण्यात आले. अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान त्यांना ही रचना सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मंदिरात हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 1978 पासून ते बंद होते. मंदिराजवळ एक विहीर देखील आहे जी पुन्हा उघडण्याची योजना अधिकाऱ्यांनी केली.
Powered By Sangraha 9.0