साप्ताहिक राशिभविष्य

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
 साप्ताहिक राशिभविष्य 
 
 
 Saptahik Rashibhavishy
 
मेष (Aries Zodiac) : कुटुंबात नाराजीचा सूर
Weekly Horoscope : या आठवड्यातही राशिस्वामी मंगळ सुखस्थानात आहे. चंद्र सुरुवातीला पंचम या शुभ स्थानात असून सप्ताहाच्या अखेरीस अष्टम या पीडा स्थानी जाईल. धनातील गुरूमुळे आर्थिक बाजू उत्तम असली, तरी कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात असलेले तणावाचे वातावरणात आता निवळू लागेल. सहकार्‍यांची व अधिकारी वर्गाची मदत मिळेल. आपली सरशी होईल. गुंतवणुकीच्या संदर्भातील निर्णय फायद्याचे ठरू शकतील. मात्र कुटुंबात काहीसा सूर उमटण्याची शक्यता राहील. कुटुंबातील बाल व युवा वर्गाकडे लक्ष द्यावे लागेल.
शुभ दिनांक - २२, २४, २५, २८.
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : आर्थिक वाढ संभव
या आठवड्यात राशिस्वामी शुक्र भाग्य स्थानात आहे आणि राशीत गुरू आहे. असे हे उत्साहवर्धक वातावरण लाभले असताना चंद्र सुखस्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. विशेषतः आठवड्याच्या पूर्वार्धात संधी लाभू शकतील. केवळ मनोबलाच्या जोरावर आपण जिद्द आणि चिकाटीने काही कठीण कामेही यशस्वी करू शकाल. त्याचा लाभ आपणास नोकरी व व्यवसायात अवश्य मिळेल. आर्थिक वाढ अनुभवता येईल. घरात मुला-मुलींची प्रगती समाधान देणारी राहील. काही विवाहेच्छू युवांच्या विवाहाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होऊ शकतील. मित्रवर्गाचे अपेक्षित सहकार्य मिळेल. हेही वाचा : काँगोच्या बुसिरा नदीत बोट उलटली, ख्रिसमससाठी घरी जाणाऱ्या 38 जणांचा मृत्यू
शुभ दिनांक २२, २३, २४, २५.
 
 
मिथुन (Gemini Zodiac) : कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल
Weekly Horoscope : या आठवड्यात राशिस्वामी बुध सहाव्या कर्म स्थानात आहे. चंद्रदेखील पराक्रम स्थानातून भ्रमणास सुरुवात करणार आहे. भाग्य स्थानी दृष्टी येऊन तो शुभता प्रदान करेल. आपल्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी संधी जरूर मिळेल. त्यातील यश आपल्या लौकिकात भर घालेल. व्यवसायात असणार्‍या मंडळींनी नवीन संकल्पना प्रगतीची चिन्हे दिसतील. नोकरीत असणार्‍यांना महत्त्वाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडता येईल. याचा पुढे लाभ मिळेलच. विरोधकांचे तोंड बंद होईल. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग वाढेल व आपल्या कार्यशैलीने दबदबा निर्माण होईल. काहींना प्रवास संभवतो.
शुभ दिनांक - २२, २४, २६, २८.
 
 
कर्क (Cancer Zodiac) : अनपेक्षित अर्थलाभ संभवतो
राशिस्वामी चंद्र धनस्थानातून या सप्ताहाचे भ्रमण करीत पंचम या शुभस्थानी जाईल. आपल्या राशीत मंगळ आहे. या शुभस्थितीमुळे आपल्या प्रलंबित योजना किंवा कामांना मूर्त रूप देता येऊ शकेल. आर्थिक बलवत्ता प्राप्त होईल. विशेषतः उत्तरार्धात काहींना अनपेक्षित अर्थलाभ होऊ शकतो. या स्थितीमुळे आपले मनोबल वाढेल. आत्मविश्वास दुणावेल व आपल्या योजनांना गती देता येऊ शके ल. काही कौटुंबिक व अडचणींवर मार्ग सापडेल. मालमत्ता व गुंतवणुकीच्या संदर्भातील निर्णय फायद्याचे ठरू शकतील. मोठी खरेदीही संभव आहे. मित्रांचा वा नातेवाईकांचा सहवास विरंगुळा देऊ शकेल. नवा जोम मिळेल.
शुभ दिनांक - २२, २४, २६, २८.
 
 
सिंह (Leo Zodiac) : भरीव बौद्धिक कामगिरी
Weekly Horoscope :  या आठवड्यात राशिस्वामी रवी पंचम या शुभस्थानी आहे तर चंद्र आपल्याच राशीतून भ्रमण करणार आहे. ही अतिशय उत्तम असलेली ग्रहस्थिती विशेषतः बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना सुयश देणारी आहे. या क्षेत्रातील मंडळी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग भरीव कामगिरी करून दाखवू शकेल. सरकारी कामात विलंबाचा सूर दिसेल; मात्र विशेष नुकसान होण्याचा संभव नाही. त्यामुळे विलंबाच्या स्थितीने निराश होण्याची गरज नाही. आपली नोकरी-व्यवसायात समाधानाचे व वातावरण राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.
शुभ दिनांक - २२, २४, २५, २८.
 
 
कन्या (Virgo Zodiac) : समाधान व प्रसन्नतेचा सप्ताह
या आठवड्यात राशिस्वामी बुध पराक्रम स्थानात आहे. चंद्र व्ययातून भ्रमण सुरू करीत असला तरी लगेच आपल्याच राशीत येणार आहे. त्यामुळे हा सप्ताह समाधानाचा व प्रसन्नतेचा असे दिसते. मित्रांचा, नातेवाईकांचा सहवास, सहली वा पर्यटनाचे आयोजन आनंददायक राहील. काहींना कुटुंबासह प्रवासास निघता येईल. काही मंडळींना मात्र त्यांच्या कार्यक्षेत्राकडे जरा गंभीरपणे लक्ष द्यावे लागू शकते. स्पर्धेच्या मार्गातूनच प्रगतीची कास धरावी लागेल. कुटुंबात काहीसे मतभेदाचे वातावरण राहू शकते. काहींना मुलाबाळांकडे लक्ष द्यावे लागेल. काही युवांना विवाह जुळण्याचे योग शकतात.
शुभ दिनांक - २२, २३, २५, २७.
 
 
तूळ (Libra Zodiac) : अचानक कौटुंबिक पेच
Weekly Horoscope :  या आठवड्यात राशिस्वामी शुक्र सुख स्थानात आहे. चंद्र लाभ स्थानातून या सप्तातील भ्रमण सुरू करीत आहे. या उत्तम स्थितीमुळे या सप्ताहात आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाची कामे व विशेषतः सरकारी कामे तडीस जाऊ शकतील. आरोग्याची साथ कौटुंबिक स्तरावर मात्र काही प्रश्न अचानक मोठे व गंभीर स्वरूप धारण करू शकतात. ते प्राधान्याने सोडवावे लागतील. अशात वडीलधारी व्यक्ती, नातेवाईकांचा सल्ला लाभकर राहील. प्रवासास निघणार असाल तर सावधगिरी बाळगा. महत्त्वाचा ऐवज, कागदपत्रे सांभाळून ठेवा. दकुटुंब व मित्रवर्ग खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहील.
शुभ दिनांक - २२, २५, २६,
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : महत्त्वाची जबाबदारी मिळावी
या आठवड्यात राशिस्वामी मंगळ भाग्य स्थानात आहे. आपल्या राशीत बुध असून चंद्र दशम स्थानातून सप्ताहाचे भ्रमण सुरू करणार आहे. या शुभ ग्रहस्थितीमुळे शासकीय कर्मचार्‍यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकेल. त्यातून मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात समाधानाची स्थिती राहील. भागीदारीत व्यवसाय करणार्‍या मंडळींना काही वेगळे घेण्याची वेळ येऊ शकते. अत्यंत विचारपूर्वक आणि हितचिंतकांचा सल्ला घेऊन योग कार्यदिशा ठरवावी. आठवड्याच्या उत्तरार्धात काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी घडू शकतात. काही युवा मंडळींचे विवाह जमण्याचे योग संभवतात.
शुभ दिनांक - २२, २४, २६, २८.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : कार्यक्षेत्रात वेगवान प्रगती
Weekly Horoscope :  या आठवड्यात राशिस्वामी गुरू सहाव्या कर्मस्थानात असून चंद्र भाग्य स्थानातून भ्रमण करीत आहे. यामुळे आपला अर्थत्रिकोण बलवान होणार आहे. या काळात कार्यक्षेत्रात वेगवान प्रगतीचीस्थिती राहील. आठवड्याच्या प्रारंभी एखादी अपेक्षित घटना, व्यवसायात एखादा सौदा मोठे यश देऊन जाईल. त्यामुळे आपला उत्साह व आत्मविश्वास दुणावेल. अधिक जोमाने, जिद्दीने काम करण्याची प्रेरणा मिळेल. आर्थिक गुंतणुकीसाठी हा काळ लाभदायी ठरू शक तो. आरोग्य उत्तम कौटुंबिक स्तरावर मात्र काही निर्णय अतिशय विचारपूर्वक घेण्याची गरज निर्माण होऊ शकते.
शुभ दिनांक - २२, २४, २६, २८.
 
 
मकर (Capricorn Zodiac) : सारासार विचार हवा
या आठवड्यात राशिस्वामी शनी धनस्थानी असून योगकारक शुक्र आपल्या राशीत आहे. चंद्र या सप्ताहात आठव्या स्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. यामुळे काहीशी संमिश्र स्थिती आपल्या वाट्याला दिसते. नोकरी-व्यवसायात काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. मात्र सारासारपणे विचार करायला हवा. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नयेत. फसगत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कुटुंबात मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. त्यावर काहीसा अधिक खर्चदेखील करावा लागू शकतो. सप्ताहाच्या उत्तरार्धात कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
शुभ दिनांक २४ ,२५, २६, २८.
 
 
कुंभ (Aquarius Zodiac) : थोडा संयम बाळगावा
Weekly Horoscope :  या आठवड्यात राशिस्वामी शनी स्वराशीत असून चंद्र सप्तम स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. या सप्ताहात काही वेगळे घडून येण्याची शक्यता नाही. साधारणतः जैसे थे स्थितीच कायम राहावी. नोकरी-व्यवसाय वगैरेतून मोठ्या अपेक्षा असतील तर त्यासाठी थोडा धीर धरावा. संयम बाळगावा लागेल. व्यवसायात निर्णय घेताना घाई करू नये. नीट विचारानंतरच पुढचे पाऊल उचलले पाहिजे. त्यातल्या त्यात महत्त्वाची कामे आठवड्याच्या पूर्वार्धात हातावेगळी करण्याचा प्रयत्न असावा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वादाचे प्रसंग उद्भवल्यास ते वाढू देऊ नयेत. तडजोडीचा मार्ग स्वीकारणे फायद्याचे ठरू शकेल. हेही वाचा : IND vs AUS: राहुलनंतर आता कर्णधार रोहितला दुखापत, VIDEO
शुभ दिनांक - २२, २३, २६, २७.
 
 
मीन (Pisces Zodiac) : कामे मार्गी लागतील
Weekly Horoscope :  या राशिस्वामी गुरू पराक्रम स्थानात असून चंद्र सहाव्या कर्म स्थानातून भ्रमण सुरू करीत आहे. या ग्रहस्थितीमुळे प्रामुख्याने या राशीच्या काही ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्यात सुधार होताना दिसेल. आपल्या व्यावसायिक व सामाजिक संबंधांमध्ये प्रगती होताना दिसेल. आर्थिक बाजू देखील मजबूत होईल. व्यवसायातील प्रलंबित कामे मार्गी लागावीत. काहींचा धार्मिक कार्याकडे कल वाढू शकतो. प्रगतीकडे ओढ राहील. या सार्‍यात मात्र खिशाकडे लक्ष असावे. खर्चावर नियंत्रण ठेवावयास हवे. युवा मंडळींचे मंगलकार्य जुळण्यासाठी चांगले योग येऊ शकतात. वीज व आगीपासून सावध. रस्त्यावर सावध असावे.
शुभ दिनांक - २२, २५, २७, २८.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६