हिवाळ्यात रात्री पायात मोजे घालून झोपणं चांगलं की वाईट?

22 Dec 2024 15:43:59
Winter health tips थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेण्यासाठी अनेकजण रात्रीच्यावेळी स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून झोपतात. यामुळे, शरीराला उब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते. हळूहळू त्यांना मोजे घालून झोपण्याची सवयच लागते. परंतु, ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.
 
 
 
soacks
 
 
 
रात्री पायात मोजे Winter health tips घालून झोपल्याने शरीराला नुकसान पोहोचू शकते. रात्री मोजे घालून झोपल्याने शरीराचे तापमान वाढते ज्यामुळे अस्वस्थता येते, ब्लड प्रेशर कमी होण्याची समस्या जाणवते.रात्री झोपताना जास्त घट्ट मोजे घातल्याने ब्लड सर्क्युलेशन बिघडू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.जे लोक जास्त वेळ मोजे घालतात, त्यांच्या नसांवर दबाव येतो आणि त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
 
 
 रात्रभर पायमोजे घालून Winter health tips झोपल्याने त्वचेला इंफेक्शन होऊ शकते. तसेच त्वचेसंबंधित विविध समस्या निर्माण होऊ शकतात. रात्रीच्यावेळी घट्ट मोजे घालून झोपल्याने पायांच्या नसांवर दाब पडतो ज्यामुळे, हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे, श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. म्हणून रात्री झोपताना मोजे घालून झोपणे टाळावे.
हिवाळ्यात पायमोजे घालून झोपण्याचे जसे नुकसान आहेत तसेच काही फायदे देखील आहेत. हिवाळ्यात मोजे घालून झोपल्याने पायांची त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होतो तसेच टाचांना भेगा पडण्यापासूनही आराम मिळतो. मोजे घातल्याने पाय उबदार राहतात.
Powered By Sangraha 9.0