amavasya 2024 हे वर्ष २०२४ संपायला अवघे काही दिवस बाकी आहे. अशात या वर्षातील शेवटची अमावस्या तिथी कधी आहे, याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली गेली आहे. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्ये तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूची पूजा करण्यात येते. असे केल्याने सुख-समृद्धी वाढ होते अशी मान्यता आहे. या वेळी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे. यंदा अमावस्या तिथी ३० की ३१ नेमकी कधी आहे जाणून घ्या.
सोमवती अमावस्या २०२४ तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, amavasya 2024 या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ३० डिसेंबरला पहाटे ४.०१ वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी ३१ डिसेंबरला पहाटे ०३:५६ वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार, ३० डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे. ३० डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी श्री हरीसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग जुळून आलाय.
गोष्टी दान करा!
पितृदोषाचा सामना amavasya 2024 करत असाल तर मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करा. यानंतर, भक्तीप्रमाणे गरम कपडे, दही, फळे, गहू, शेंगदाणे इत्यादी गरीब लोकांना दान करा. असे मानलं जातं की, या वस्तूंचं दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होते.
चुकूनही 'या' ६ चुका करू नका!
सोमवती अमावस्येच्या amavasya 2024 दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमीजवळून जाणे टाळावे.
सोमवती अमावस्येच्या दिवशी मद्य, मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करु नये. त्यामुळे, या गोष्टी खाणे टाळा.
त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा. कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी होऊ नका.
या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करु नये. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरु करू नये.
सोमवती अमावस्या पितरांना समर्पित आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून दान वगैरे अशी कामे केली जातात.
या दिवशी राग आणि अहंकार टाळा. स्वत: च्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय व्यक्तीला त्रास देऊ नका.