जगातील या देशांमध्ये ख्रिसमस विचित्र पद्धतीने साजरा

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
christmas celebrations नाताळ हा एक सण आहे जो जगभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. हा सण ख्रिश्चनांसाठी खूप खास आहे. असे मानले जाते की, येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला होता. त्यानंतर, हा दिवस उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या दिवशी लोक चर्चमध्ये जातात, मेणबत्त्या लावतात आणि प्रार्थना करतात.
सामान्यतः लोक ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्री सजवतात, प्रार्थना करतात व पार्टी करतात. पण जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये तो साजरा करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. काही देशांमध्ये ख्रिसमस पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो,.तर अनेक ठिकाणी तो विचित्र पद्धतीने साजरा केला जातो.
 
 
celebration
 
 
 
नॉर्वे या दिवशी झाडू लपवतात
नॉर्वेमध्ये ख्रिसमस christmas celebrations विचित्र पद्धतीने साजरा केला जातो. येथे लोक घरातुन झाडू लपवतात. असे मानले जाते की, जर ख्रिसमसमध्ये झाडू लपविल्या नाहीत तर वाईट आत्मा त्याची चोरी करतात. त्यामुळे, घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये या कारणाने लोक ते लपवून ठेवतात.

 
जपानमध्ये kfc फूड
जपानमध्ये ख्रिसमसच्या christmas celebrations वेळी, बहुतेक लोक त्यांच्या कुटुंबासह जेवणाचा आनंद घेतात. इथले लोक KFC वरून जेवण ऑर्डर करतात. १९७० मध्ये, KFC ने जपानमध्ये ख्रिसमससाठी एक विशेष प्रचार मोहीम चालवली होती. तेव्हापासून जपानमध्ये ख्रिसमसच्या वेळी ही एक परंपरा बनली आहे. २५ डिसेंबर रोजी KFC चे जेवण ऑर्डर करणे येथील परंपरेचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

 
शूजमध्ये कँडी भरणे, जर्मनी
जगभरातील मुलांचा christmas celebrations असा विश्वास आहे की, सांता त्यांना ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी येतो. जर्मनीमध्ये, २५ डिसेंबरच्या रात्री, सर्व मुले त्यांचे बूट घराबाहेर ठेवतात. जर त्यांचे वर्तन वर्षभर चांगले असेल तर , त्यांच्या शूजमध्ये कँडी असतात.

एक जास्तीची प्लेट टेबलवर ठेवतात
पोर्तुगालमध्येही ख्रिसमस christmas celebrations अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांचे पूर्वज त्यांच्या मृत्यूनंतर पृथ्वीवर ख्रिसमस साजरा करण्यासाठी येतात. पोर्तुगालमध्ये या दिवशी लोक जेवणाच्या टेबलावर त्यांच्या पूर्वजांसाठी प्लेट्स ठेवतात.