ऑन द स्पॉट’ चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार

    दिनांक :22-Dec-2024
Total Views |
- लोकमाता ताई सुकळीकर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन
- चित्र मनापासून वाचल्यास मनातील कल्पना ओळखता येईल
 
नागपूर,
painting competition : छोटया मुलांनी काढलेल्या प्रत्येक चित्रातील भाव सहजभावनेने ओळखा, असे चित्र मनापासून मुलांच्या मनातील विविध कल्पना सहजरित्या ओळखता येईल. मुख्यत: मुलांच्या चुका काढणे सोडा म्हणजे मुलांना सांभाळणे सोपे होईल, असे स्पष्ट प्रतिपादन बसोली ग्रुपचे अध्यक्ष, चंद्रकांत चन्ने यांनी केले. लोकमाता श्रध्देय ताई सुकळीकर स्मृती ऑन द स्पॉट बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर, जगदीश सुकळीकर, मीरा खडक्कार व प्रशांत देशपांडे उपस्थित होते.
 
 
bal-jagat-2
 
योग्य संस्कार करण्याचे काम बालजगतचे मुलांच्या हातात मोबाईल ऐवजी जेव्हा रंगाचा ब्रश येतो, तेव्हा मनातील विविध कल्पना चित्रात साकारलेल्या दिसून येतात. तसेच योग्य वयात योग्य संस्कार करण्याचे काम बालजगतच्या माध्यमातून आज होत असल्याचा विश्वास विष्णू मनोहर यांनी व्यक्त केला.
 
 
painting competition : पुरस्कार विद्यार्थ्यांमध्ये शौर्य सिंगम, अव्दैत भांडारकर, राधा बागेकर, यथार्थ मोहीते, अमृत रेठे, रस्मा मेलगंडी, अर्पूवा भदे, अरोही वाघमारे, समृध्दी कवाळे, अनन्या रिघे, रुषांक ताजणे, रोमित गावंडे, स्वरा बांगर, अंश पंचभाई, शिखर बाजपेयी, साई कडू, वामिका वाघाये यांचा समावेश होता. विजेत्यांना विष्णू मनोहर, जगदीश सुकळीकर, मीरा खडक्कार व चंद्रकांत चन्ने यांच्या पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गौरी सरनाईक आभार प्रशांत देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक काशिकर, प्रशांत अत्रे, सतिश बेलवलकर, निकीता लुटे, नम्रता पिंपळखुटे,अशोक काशिकर, संध्या मुळावकर,अंजली साठे, साईली जतकर, रेखा मुडे आदींनी परिश्रम घेतले.