VIDEO: सरकार आगामी घोटाळ्याची तयारी करतेय !

23 Dec 2024 17:29:02
मुंबई,
निवडणूक नियमांमध्ये government plans नुकतेच बदल केले असताना विरोधक संतापले आहेत. दरम्यान, या घटनेबद्दल खा. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात निवडणूक नियमांत झालेल्या बदलामुळे जोरदार राजकारण रंगले आहे. आता या प्रकरणी विरोधकांद्वारे सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेची माहिती न दिल्याबद्दल देखील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, शिवसेना उबाठाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी या पूर्ण घटनेबद्दल आपले विचार व्यक्त करत ही लोकशाहीची हत्या असल्याचे सांगितले आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.
 
sanjay raut
 
 
निवडणुक government plans आचार संहितेत झालेल्या बदलांबद्दल बोलतांना राऊत म्हणाले की, ही लोकशाहीची हत्या आहे. जे नियम करण्यात आले आहेत, त्यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन कुठलीही माहिती मागू शकत नाही. राऊत पुढे म्हणाले की, ही हुकूमशाही आहे. आम्ही का नाही विचारू शकत? सर्वप्रथम तुम्ही ईव्हीएम काढून बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि निवडणूक संबंधित कागदपत्रे मागितल्यानंतर निवडणूक आयोगाने हा नियम बदलण्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.
 
 
 
 
आपले हक्क स्पष्ट government plans करताना राऊत पुढे म्हणाले की, आमच्या मताचे काय झाले हे जाणून घेण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही दिलेले मत कुठे गेले? ते म्हणाले की, महाराष्ट्र निवडणुकीतील अनियमितता पाहता निवडणूक आयोगाने लगेच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस केली. त्यानंतर लगेच २४ तासांत कायदे बदलण्यात आले. सरकार आगामी भविष्यात अनेक घोटाळे करणार आहे आणि त्याचसाठी ही तयारी सुरु आहे. महमूद प्राचा विरुद्ध ईसीआय प्रकरणात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टने नुकताच दिलेल्या निर्देशाच्या पार्शवभूमीवर हे बदल करण्यात आले आहे. या दरम्यान, न्यायालयाने निवडणुक आचार नियम १९६१ च्या नियम ९३(२) अंतर्गत सीसीटीव्ही फुटेजसह हरियाणा विधानसभा निवडणुकीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र हे केवळ निवडणुकीच्या कागदपत्रांपर्यंत मर्यादित असून यात इलेकट्रोनिक रिकोर्डचा समावेश नाही असे सांगितले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0