नागपूर,
Akshat Dakshindas : अक्षत दक्षिणदास याने लॉन-टेनिस सामन्यात दुहेरीत विजेतेपद पटकाविले. अंडर-14 व अंडर-17 मुला-मुलींच्या टेनिस सामने काल रामनगर टेनिसकोर्टवर खेळल्या गेले. क्षेत्रीय स्पर्धेतील नागपूर शहरातले विजेते आगामी राज्यस्तरीय सामने जे कोल्हापूर आणि नाशिकला पुढच्या महिन्यात होणार आहे, त्यात सहभागी होतील.
अक्षतने प्रणव गायकवाडला दोन्ही वयोगटात पराभूत केले. मुलींच्या (अंडर-14) वयोगटात शर्वरी श्रीरामेने सुरमयी साठे तसेच (अंडर-17) देवश्री डगवारने श्राव्या रामभजानीला हरविले.
नागपूर जिल्हा हार्डकोर्ट टेनिस असोसिएशन उपाध्यक्ष अशोक भिवापूरकर व सहसचिव विक्रम नायडू यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजक डॉ. सुधीर भिवापूरकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.