नागपूर,
प्रयागराज Mahakumbh 2025 महाकुंभ मेळ्याकरिता दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या पाच रेल्वेंना नागपूर मंडळातील गोंदिया, बालाघाट व नैनपूर स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. महाकुंभ मेळ्याकरिता देशभरात तीन हजार विशेष रेल्वे चालविल्या जाणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील गोंदिया, बालाघाट व नैनपूर स्थानकावरुन रेल्वेव्दारे मेळ्याला जाता येणार आहे.
Mahakumbh 2025 संबंधित पाचपैकी कन्याकुमारी- गया-कन्याकुमारी (०६००५/०६००६) रेल्वे कन्याकुमारी येथून ६ व २० जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता तर, गया येथून ९ व २३ जानेवारी रोजी रात्री ११.५५ वाजता, कोच्चुवेली-गया- कोच्चुवेली (०६०२१/०६०२२) रेल्वे कोच्चुवेली येथून ७ व २१ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता तर, येथून १० व २४ जानेवारी आणि ७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५५ वाजता, चेन्नई- गोमतीनगर-चेन्नई (०६००१/०६००२) रेल्वे चेन्नई येथून ८, १५ व २२ जानेवारी आणि ५, १९ व २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.२० वाजता तर, गोमतीनगर येथून ११, १८ व २५ जानेवारी, ८ व २२ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ३.४५ वाजता, कन्याकुमारी-बनारस कन्याकुमारी (०६००३/०६००४) रेल्वे कन्याकुमारी येथून १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता तर, बनारस येथून २० फेब्रुवारी सायंकाळी ६.०५ वाजता, ०६००७/०६००८ कोच्चुवेली-बनारस-कोच्चुवेली (०६००७/०६००८) रेल्वे कोच्चुवेली येथून १८ व २५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता तर, बनारस येथून २१ व २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०५ वाजता प्रस्थान करणार आहे.
१३ हजार नियमित रेल्वे
Mahakumbh 2025 देशभरातून १३ हजार रेल्वे प्रयागराज महाकुंभाला जाणार आहेत. भाविकांना आपापल्या सोयीच्या ठिकाणाहून त्या रेल्वे पकडता येतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.