तुटलेले सामान आणि सीटच्या मधात आक्रोश करताना लोक... विमान अपघाताचा VIDEO

26 Dec 2024 09:33:45
अकताऊ, 
Kazakhstan Plane Crash कझाकस्तानमधील अकताऊ शहराजवळ बुधवारी क्रॅश झालेल्या अझरबैजान एअरलाइन्सच्या विमानातील एका प्रवाशाने अपघातापूर्वीचे आणि नंतरचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. या व्हिडीओमध्ये विमानातील भयानक दृश्य समोर आले आहे. एम्ब्रेर 190 हे जेट अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील ग्रोझनीकडे जात होते. दरम्यान तो अपघाताचा बळी ठरला. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला तर 29 जण बचावले.
हेही वाचा : बांगलादेशात हिंदूंनंतर आता ख्रिश्चनांचे जीव धोक्यात!  

Kazakhstan Plane Crash 
 
 
विमानात बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये विमानाच्या आतील केबिनची अवस्था पूर्णपणे बिकट झाली आहे. विमानाच्या आत लोक इकडे तिकडे ओढताना दिसतात. विमानातील सीट तुटून विखुरल्या आहेत. प्रवाशांचे सामान इकडे तिकडे विखुरलेले आहे. Kazakhstan Plane Crash अझरबैजान एअरलाइन्सने यापूर्वी सांगितले होते की त्यांच्या एम्ब्रेर 190 विमानाला शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. अधिका-यांनी सांगितले की, हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियन शहर ग्रोंजी येथे गेले होते. सुरुवातीला असे सांगण्यात आले की विमानाला पक्षी आदळल्यानंतर वैमानिकाने विमान अकताऊच्या दिशेने वळवण्याचा निर्णय घेतला आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. विमानात बसलेल्यांमध्ये पाच क्रू मेंबर्सचा समावेश होता.
 हेही वाचा : विराटने सॅम कोन्स्टासला भर मैदानात असे मारले VIDEO
 
 
सौजन्य : सोशल मीडिया 
 
 हेही वाचा : पाकिस्तानवर लवकरच होणार ‘महा अटॅक’
अझरबैजान एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, विमानातील 42 प्रवासी अझरबैजानचे नागरिक होते. याशिवाय 16 रशियन नागरिक, कझाकिस्तानचे सहा नागरिक आणि किर्गिस्तानचे तीन नागरिक होते. Kazakhstan Plane Crash ऑनलाइन समोर आलेल्या मोबाईल फोनवरून घेतलेल्या व्हिडीओमध्ये विमान वेगाने जमिनीवर पडताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये विमानाचा शेपटीचा भाग पंखांपासून वेगळा झालेला आणि बाकीचा भाग गवतात उलटा पडलेला दिसत आहे.
 
 
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0