इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
Rastriya Vanvasi Krida spardha : सक्षम नेतृत्व मिळताच देश सर्वच क्षेत्रांत प्रगतिपथावर आहे असे आजचे चित्र आहे. अर्थ, संरक्षण, संसाधन विकास, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत होणारी प्रगती आज दृश्यमान आहे. याला अपवाद फक्त एकच क्षेत्र दिसते आहे आणि ते म्हणजे क्रीडाक्षेत्र होय. आजही ऑलिम्पिकच्या पदक भारताचा नंबर खालून सापडतो. खेळांचा प्रकार कोणताही असो, भारतीय संघाची कामगिरी यथातथाच असते. भारतीयांच्या क्रीडाक्षेत्रात सातत्याने पिछाडीवर असण्याला प्राकृतिक, सामाजिक आणि मानसिक अशी कारणे आहेत. पण पैशाचे पाठबळ, संधीची कमतरता आणि माहितीचा अभाव ही विशेष कारणे होत असेच म्हणावे लागते. जागतिक पातळीवर भारतीय लोकांची नसलेली नैसर्गिक शारीरिक क्षमता हे महत्त्वाचे प्राकृतिक कारण होय. अनेक खेळ जसे की फुटबॉल, अॅथ्लेटिक्स, व्हालिबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कुस्ती या क्रीडा प्रकारात लागणारी मजबूत शारीरिक क्षमता नैसर्गिकरीत्या भारतीयांकडे नाही. हरयाणा आणि पंजाब या दोनच राज्यांतील स्त्री व पुरुषांकडे जागतिक स्तरावर वरील क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करता येण्याजोगी शारीरिक क्षमता आढळते.
Rastriya Vanvasi Krida spardha : इतर राज्यांमधील स्त्री-पुरुष हे जागतिक प्रमाणाच्या तुलनेत कमी शारीरिक क्षमतेचे असल्याने वरील क्रीडा प्रकारात कौशल्य प्राप्त करूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके किंवा क्रमवारीता प्राप्त करण्यात कमी पडतात. ही नैसर्गिक मर्यादा लक्षात आल्यावर या देशातील क्रीडातज्ज्ञांनी यावर उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा लक्षात आले की, जागतिक स्तरावर इतर काही खेळांमध्ये उत्तम कामगिरी करणे भारतीयांना या मर्यादांसह शक्य आहे. हे खेळ म्हणजे आर्चरी, शूटिंग, अॅक्वेटिक्स, हॉकी, बॅडमिंटन यासारखे अनेक खेळ जे काही तरी ‘साधनं’ वापरून खेळले जातात. मग भारतीय खेळ प्राधिकरणाने भारतातील काही प्रदेश, ज्या प्रदेशात ठरावीक कौशल्यांची निसर्गतः जोपासना केली जाते, असे प्रदेश आणि ठरावीक उपजत गुणांची आवश्यकता असणारे खेळ यांची सांगड घालून ‘एरिया ही ठरावीक क्रीडा प्रकारांच्या विकासाची योजना लागू केली. या योजनेसाठी संशोधन करताना आर्चरी आणि अॅथ्लेटिक्स या दोन खेळांत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी लागणारे गुण आणि क्षमता या देशातील वनवासी क्षेत्रातील जनजातींमध्ये विशेषत्वाने आढळून आले. तेथूनच वनवासी जनजाती राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. याच सुमारास भारतातील वनवासी जनतेचे होणारे धर्म परिवर्तन घेऊन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वनवासी जनजातींमध्ये कल्याण व विकास कार्य हाती घेतले. वनवासी कल्याण म्हणजे फक्त आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास एवढाच याचा आयाम असणारच नव्हता. वनवासी जनजातींचे होणारे धर्मांतरण रोखण्याबरोबरच या समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. अर्थात् त्यामुळे क्रीडा हा विषय प्राधान्यक्रमात होता. वनवासी जनजातींमधील प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळावी या हेतूने १९८८ मध्ये मुंबई येथे वनवासी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वनवासी कल्याण आश्रमाने आयोजन करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून सातत्याने वनवासी कल्याण आश्रम फक्त वनवासी जनजातीच्या खेळाडूंकरिता दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धांचे आयोजन करीत आहे. यावर्षी रायपूर येथे होणार्या स्पर्धांचे हे २४ वे वर्ष आहे. हा उपक्रम हाती घेतल्यापासून वनवासी कल्याण आश्रम ही स्पर्धा आर्चरी (धनुर्विद्या) आणि इतर कोणता तरी एक खेळ अशा दोन खेळांसाठी आयोजित करीत असते. या वर्षीच्या आर्चरी आणि त्याबरोबर फुटबॉल या दोन क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेतल्या जात आहेत. या क्रीडा स्पर्धा छत्तीसगड राज्याची असलेल्या रायपूर येथे २७ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात घेण्यात येत आहेत. या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय हे प्रमुख अतिथी असणार आहेत. या वर्षीच्या या आयोजनाची जबाबदारी छत्तीसगड वनवासी कल्याण आश्रमाने घेतली आहे.
वनवासी क्षेत्राने आज भारताला अनेक खेळाडू दिलेले आहेत. वानगीदाखल लिंबाराम, कविता राऊत, मनीष डामोर अशी अनेक नावे सहजपणे सांगता येतील. मात्र या सर्व खेळाडूंना कोणत्या कठीण परिस्थितीतून वाटचाल करावी लागते याची सामान्य माणसाला जाणीवही नसते. जिथे साधे ‘प्राथमिक आरोग्य केंद्र’ देखील दहा बारा किलोमीटर दूर असते, अशा दुर्गम आणि मागास क्षेत्रातील पालकांना फक्त खेळासाठी देणे, ही गोष्ट आजही मान्य होणारी नाही. जिथे आरोग्याला आवश्यक अशा सुविधांची वानवा आहे अशा प्रदेशात खेळांसाठी शारीरिक आणि मानसिक तयारीकरिता आवश्यक अशा सुविधा मिळणे ही अत्यंत कठीण गोष्ट ठरते. आज राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना शारीरिक व मानसिक अशा दोन्ही स्तरांवर तयारी करण्याची आवश्यकता असते. खेळाडूंना मैदानावर जशी शारीरिक क्षमतांची निर्मिती आणि जोपासना करणे गरजेचे आहे तसेच मैदानाबाहेर त्याची मानसिक तयारी करून घेणे देखील तितकेच गरजेचे असते. त्याचवेळी खेळाडूंना स्पर्धेत जेथे परफॉर्मन्स द्यायचा असतो, त्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आपले सर्वोत्तम देऊन पदके मिळवणे हे अत्यंत अवघड असे आव्हान असते. कारण अनेकदा खेळाडू सराव करीत असलेल्या ठिकाणचे वातावरण ज्या ठिकाणी स्पर्धा असतात तेथील वातावरण अत्यंत विषम असू शकते. क्रीडा क्षेत्रात उपजत असलेल्या प्रतिभेला वाव देणे हा फक्त अर्धाच भाग होतो. त्या प्रतिभेची जोपासना करणे, त्याला पैलू पाडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विजयी करणे हे नेहमीच अत्यंत कठीण असे आव्हान असते. कारण खेळाडूंची अंगभूत प्रतिभा लक्षात आल्यानंतर त्याची योग्य करून घेण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागत असतो. तरुण खेळाडूमधील प्रतिभा लक्षात घेणे, मग त्याची जोपासना आणि योग्य आकार देणे, खेळाडूची शारीरिक तयारी, मानसिक कणखरपणा, आणि योग्य असा काळ किंवा वेळ या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या तरच क्रीडा क्षेत्रात विजेते होता येते. यातील एकही बाब हुकली तर वर्षोनुवर्षे घेतलेली मेहनत वाया जात असते.
Rastriya Vanvasi Krida spardha : वनवासी जनजातींना या देशाच्या संस्कृतीपासून तोडण्याचे कारस्थान ख्रिश्चन चर्च आणि इस्लाम अनेक दशकांपासून करीत होते. वनवासी बांधव जरी निसर्गपूजक असले तरी ते हिंदू आहेत याविषयी शंका नाही. पण शहरांपासून दूर अरण्यात रहिवास असलेला हा समाज मधल्या काही काळात दुर्लक्षित होता. आधुनिक शिक्षणाचा या वनांमध्ये अभाव असल्याने, धर्मातील एक मोठा वर्ग धर्मांतरित करण्यासाठी या आधीच्या काळात बरेच प्रयत्न झाले. वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यामुळे याला फार मोठ्या प्रमाणावर आळा बसलेला दिसून येतो. मात्र बुद्धिभेद करून, कपट कारस्थानाने या वनवासी बंधूंच्या मनात वेगळेपणाची भावना रुजवण्याचा प्रयत्न ख्रिश्चन चर्च सातत्याने करताना दिसते. ही तुटलेपणाची किंवा इतर हिंदू समाजापेक्षा आपण आहोत ही भावना वनवासी बांधवांच्या मनात निर्माण होऊ नये यासाठी वनवासी कल्याण आश्रम कार्य करीत आहे. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास आणि समरसता असे चार आयाम क्रीडा क्षेत्राला असतात. राष्ट्रीय पातळीवर वनवासी क्षेत्रातील खेळाडूंना चमकण्याची संधी क्रीडा स्पर्धा देतात. त्यामुळेच शहरी समाजाने या स्पर्धांना प्रेक्षक या नात्याने हजेरी लावून या कौतुक करणे जसे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विविध खेळांतील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी देखील या वनवासी क्षेत्रातील खेळाडूंच्या प्रतिभेला जोखण्यासाठी, टॅलेंट हंटकरिता अशा स्पर्धांना हजेरी लावणे देशाच्या क्रीडा क्षेत्राला अधिक उंची गाठण्यासाठी सहायक ठरेल.
- ९८८१२४२२२४