बोटॉक्सचे व्यसन, महिलेने ५३ लाख रुपये केले खर्च

27 Dec 2024 16:12:52
कैनबरा, 
Addiction to Botox बोटॉक्स उपचाराबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. सोप्या शब्दात सांगायचे तर बोटॉक्स हा एक प्रकारचा कॉस्मेटिक आहे जो शरीरात इंजेक्ट केला जातो, जो अँटी-एजिंग कॉस्मेटिक उपचारांमध्ये वापरला जातो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर लावल्याने त्या भागाला चांगला आकार दिला जात. ज्यामुळे, व्यक्ती तरुण दिसते. हे शरीरासाठी देखील हानिकारक आहे. परंतु, लोक केवळ सुंदर दिसायचे असल्याने ते वापरण्याकडे झुकतात. एका ऑस्ट्रियन मॉडेलला बोटॉक्सचे इतके व्यसन लागले आहे की, ते चेहऱ्यावर लावून तिने त्याचे असे रूपांतर केले की, तुम्हाला तिचा चेहरा बघावसाही वाटणार नाही. एवढेच नाही तर तिला शस्त्रक्रियेसाठी ५३ लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.
 
 
 
botox 1 
 
 
 
एका वेबसाइटच्या Addiction to Botox रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील ३० वर्षीय मॉडेलला सोशल मीडियावर 'फेटिश बार्बी' म्हणून ओळखले जाते, तथापि, हे तिचे खरे नाव नाही. ती बोल्ड आणि आक्षेपार्ह मजकूर तयार करून चर्चेत राहते.एका मुलाखतीत तिने स्वतःबद्दल बरेच काही सांगितले. ती म्हणाली की, तिच्या मित्रांना वाटते की ती बोटॉक्स लावून तिचा चेहरा खराब करेल. पण तिला त्यांनी काय म्हटले याची पर्वा नाही. कारण, तिला तिच्या चेहऱ्याचे खोटे व फुगलेले रूप आवडते.
 
 
फिरलवर लाखो रुपये खर्च
 
 
मोठे केस, मोठे Addiction to Botox ओठ, लांब नखे हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे. ती दर ३ ते ४ महिन्यांनी लिप फिलर करून घेते. ज्यामुळे, तिचे ओठ अधिक मोकळे दिसतात. आतापर्यंत बोटॉक्स उपचारांवर त्यांनी ३२ ते ५३ लाख रुपये खर्च केले आहेत. तिला आता बोटॉक्सचे व्यसन लागले आहे, असे ती सांगते . वयाच्या १८ व्या वर्षापासून ती लिप फिलर वापरत आहे.
 
 
लोक चेष्टा करतात
 
 
ती म्हणते Addiction to Botox की, एकीकडे तिचे मित्र तिच्याबद्दल चिंतेत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. इतकंच नाही तर ती कुठेतरी बाहेर गेली तरी लोक तिच्याकडे टक लावून बघतात. ती म्हणते की, लोकांना बऱ्याचदा असे वाटते की ती अज्ञानी आहे, तिला जगाबद्दल काहीही माहिती नाही. परंतु, ती नेहमीच तिच्या द्वेष करणाऱ्यांना चुकीचे सिद्ध करते.
Powered By Sangraha 9.0