disposable glass आपल्या देशात चहाचे शौकीन लोकांची कमतरता नाही. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात. शाळा-कॉलेज असो की, रस्त्याच्या कडेला दुकान किंवा ऑफिसच्या बाहेरच्या टपरीवर आपण चहा प्यायला जातो. जिथे दुकानदार डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा देतो. आपणही बोलत असताना चहा पितो, तो किती घातक ठरू शकतो याची आपल्याला कल्पनाच नाही.डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणे धोकादायक असू शकते. यामुळे, आरोग्याची गंभीर हानी होऊ शकते.
डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा पिण्याचे नुकसान
आरोग्य तज्ज्ञांच्या disposable glass मते, डिस्पोजेबल पॉलीस्टीरिनपासून बनलेले असतात. गरम चहा प्यायल्यास त्यासोबत हानिकारक पदार्थ शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे, कर्करोगाचा धोका वाढू शकतो. चहा प्यायल्याने अनावश्यक थकवा, एकाग्रतेचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने किडनीला सुद्धा गंभीर नुकसान होऊ शकते.
डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा पिण्याचे धोके कोणते ?
१. गर्भवती disposable glass महिलांसाठी धोकादायक
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डिस्पोजेबल ग्लासेसमध्ये मेट्रोसॅमिन, बिस्फेनॉल ए व इतर अनेक रसायने असतात, जी शरीरासाठी धोकादायक असतात. त्यामुळे, थकवा, एकाग्रतेचा अभाव, रक्तदाब, साखर, थायरॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे, गरोदर महिलांना तसेच त्यांच्या बाळाचेही नुकसान होऊ शकते.
२. कर्करोगाचा धोका
डिस्पोजेबल disposable glass कपमध्ये गरम चहा प्यायल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक व इतर रसायने गरम चहासोबत शरीरात पोहोचतात. त्यामुळे गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे हे टाळावे.
३. हार्मोनल असंतुलन, पाचन समस्या
डिस्पोजेबल disposable glass कपमध्ये गरम चहा प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक व इतर रसायने शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. गरम चहा प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.
४. त्वचा, तोंड व घशाच्या समस्या
डिस्पोजेबल disposable glass कपमध्ये गरम चहा प्यायल्याने त्वचेला हानी पोहोचते. याशिवाय, तोंड व घशाचा त्रास होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे, अनेक प्रकारचे आजार पसरतात.
५. पर्यावरणाची हानी
डिस्पोजेबल disposable glass कपमध्ये गरम चहा प्यायल्यानंतर तो फेकून दिला जातो. जो पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे, पर्यावरण प्रदूषण पसरते, ज्याचा परिणाम पुन्हा मानवी शरीरावर होऊ शकतो. कधीही डिस्पोजेबल कपचा वापर करू नये.