साप्ताहिक राशिभविष्य

29 Dec 2024 06:00:00
साप्ताहिक राशिभविष्य  
 
 
saptahik
 
 
मेष (Aries Zodiac) : कामाची आखणी करा
Weekly Horoscope : या आठवड्यात आपला राशिस्वामी मंगळ चतुर्थ या सुख स्थानात असून, चंद्र अष्टम या पीडादायक स्थानातून भ्रमण सुरू करणार आहे. यामुळे सुरुवात काहीशी संमित्र असली, तरी मध्यापासून आठवडा आपणास सुखद आर्थिकदृष्ट्या उत्तम जाऊ शकेल. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे निर्णय सप्ताहाच्या मध्यानंतर घेणे हितकर ठरेल. कामाची योग्य आखणी करून ते मार्गी लावणे फायद्याचे ठरेल. व्यवसायात असाल तर मोठे व्यवहार या काळात पूर्ण होऊ शकतील. कुटुंब व नातेवाईकांमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक ठरेल. कोणीही दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या.
शुभ दिनांक ३१, १, २, ३.
 
 
वृषभ (Taurus Zodiac) : जुळवून घ्यावे लागेल
या आठवड्यात आपला राशिस्वामी शुक्र आता दशम या कर्म स्थानात मुक्कामाला आला असल्यामुळे विशेषतः आपल्या कार्यक्षेत्रात बरेच काही चांगले व शुभकारक घडण्याची शक्यता आहे. तथापि, व्ययेश मंगळाच्या भाग्य स्थानावरील दृष्टीमुळे अडचणीत आणणारे काही किरकोळ प्रसंग अचानक निर्माण होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे सावध व सतर्कपणे आपले सारे निर्णय घ्यावयास हवेत. समोरची व्यक्ती विश्वासातली नसेल तर आपल्या योजना उघड करू नका. नवा व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीची पुरेशी खातरजमा करून घ्या. या सप्ताहात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
शुभ दिनांक - २९, ३१, १, ३.
 
 
मिथुन (Gemini Zodiac) : मोहाला बळी पडू नका
Weekly Horoscope :  आपला राशिस्वामी बुध सहाव्या स्थानात असून, या आठवड्यात चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून बुधाच्या साक्षीनेच सुरू होणार आहे. त्यामुळे हा सप्ताह आपणास बव्हांशी अनुकूल आहे. त्यामुळे आपली आर्थिक कामे आणि कार्यालयीन कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आठवड्याची सुरुवात एखादा आर्थिक लाभ देणारा ठरू शकतो. मात्र सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात काही गैरसमज, अफवा निर्माण झाल्यास विचलित होऊ कोणत्याही मोहाला बळी पडू नका. व्यसने, सवयी वगैरे बाबतीत सावध राहा. आपल्या कामात जेवढ्यास तेवढेच राहावयास हवे. आर्थिक स्थिती मजबूत राहील, मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. हेही वाचा : नव्या इतिहासाची नांदी...
शुभ दिनांक - ३०, ३१, १, २.
 
 
कर्क (Cancer Zodiac) : मनाचे संतुलन राखा
आपला राशिस्वामी चंद्र या आठवड्याच्या प्रारंभी पंचम या शुभस्थानात आहे व आठवडाअखेर अष्टम या पीडादायक स्थानात जाईल. चंद्राचे हे भ्रमण आपणास सुरुवातीला आर्थिकदृष्ट्या अतिशय उत्तम राहील. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात काहीसा मानसिक क्लेश निर्माण होऊ शकतो. आपल्या नियोजित कामांमध्ये काही विलंब होऊ शकतो. काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. अचानक खर्चवाढीचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. अशात मनाचे संतुलन ढळू देऊ नका. खंबीर सावध निर्णय घेतले पाहिजेत. दरम्यान, काही मंडळींना आरोग्यासंबंधी किरकोळ त्रास संभवतात. या काळात औषधोपचार आणि पथ्ये सांभाळली पाहिजेत. हेही वाचा : VIDEO : बोअरवेल खोदताना जमीन फाटली, मशीन आणि ट्रक खड्ड्यात...
शुभ दिनांक - २९, ३०, ३१, १.
 
 
सिंह (Leo Zodiac) : कुटुंबात मतभेद संभव
Weekly Horoscope :  आपला राशिस्वामी रवी पंचम या शुभ स्थानात आहे तर चंद्र चतुर्थ या सुख स्थानातून या सप्ताहाचे भ्रमण सुरू करणार असून, तो आपल्या सप्तमात येणार आहे. सप्तमात शनी व शुक्र आधीपासून असून त्यांच्या प्रभावाने आपल्या नोकरी-व्यवसायात या सप्ताहात काहीसे मंदीचे सावट निर्माण झालेले जाणवू शकते. कुटुंबात महिला मंडळींच्या, जोडीदाराच्या तसेच वयस्क मंडळींच्या आरोग्याबाबत थोड्याफार कुरबुरी निर्माण होऊ शकतात. कुटुंबात, तसेच जोडीदाराशी काही मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा मतभेद, वादविवाद यामुळे तणाव शक्यता आहे. तो प्रयत्नपूर्वक दूर करावयास हवा.
शुभ दिनांक - ३०, ३१, १, २.
 
 
कन्या (Virgo Zodiac) : नियोजित वेळेत उद्दिष्ट्यपूर्ती
या आठवड्यात आपला राशिस्वामी बुध पराक्रम स्थानात आहे. चंद्रदेखील या सप्ताहातील भ्रमणाची सुरुवात पराक्रम स्थानातूनच बुधाच्या साक्षीने सुरू करीत आहे. हे दोन्ही ग्रह पराक्रम स्थानाला पाहात असल्याने त्यांचे उत्तम पाठबळ मिळावे. कर्म स्थानातून पुरेसे आर्थिक बळ देत आहे. तो आपणास कोणत्याही परिस्थितीत नाउमेद होऊ देणार नाही. आतापर्यंत प्रलंबित असलेली कामे मार्गी लागावीत. आपली उद्दिष्टे नियोजित वेळेत पूर्ण करता येतील. प्रवासाचे योग संभवतात. तसेच काही मंडळींना विदेश गमनासंबंधाने हालचाली जाणवतील. हेही वाचा : VIDEO : दक्षिण कोरियात धावपट्टीवर उतरताना विमान भिंतीला आदळले, 47 जणांचा मृत्यू
शुभ दिनांक - २९, ३१, ३, ४.
 
 
तूळ (Libra Zodiac) : भाग्यवर्धक संधींना चालना
Weekly Horoscope :  आठवडयात आपला राशिस्वामी शुक्र पंचम या शुभ स्थानात योगकारक शनीसोबत असून तो काही भाग्यवर्धक संधींना चालना देण्याची शक्यता आहे. चंद्र धनस्थानातून भ्रमणाला सुरुवात करीत शेवटी शनी-शुक्राच्या सोबतीला जाईल. विशेषतः साहित्य, कला, संगीत, विज्ञान, संगणक वगैरे क्षेत्रातील मंडळींची अपेक्षित दिशेने घोडदौड या सप्ताहात सुरू राहणार आहे. काही लोकांना या आठवड्यात कार्यक्षेत्रातून चांगला नावलौकिक, प्रसिद्धी, समाजाकडून कौतुक, मानसन्मान यांचा लाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात आपली कार्यक्षमता सिद्ध होऊ शकते. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक - २९, ३१, २, ४.
 
 
वृश्चिक (Scorpio Zodiac) : आर्थिक बलवत्ता लाभावी
या आठवड्यात आपला राशिस्वामी मंगळ भाग्य स्थानातून काही उत्तम व भाग्यवर्धक घटनाक्रम आपल्या वाट्याला आणण्याची शक्यता आहे. आपल्याच राशीतून लाभेश बुधाच्या साक्षीने भ्रमण सुरू करणार आहे. त्यामुळे हा आठवडा आपला आर्थिक ताळेबंद वृद्धिंगत करणारा ठरू शकतो. दरम्यान, कुटुंबात काहींच्या आरोग्याच्या संबंधात किरकोळ कुरबुरी निर्माण होऊ शकतात. काहींना प्रवास, तीर्थाटनाचे योग संभवतात. महिला वर्गाचा उत्साहपूर्ण सहभाग व मदत मिळेल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित व अचानक घडणारे घटनाक्रम फायद्याचे ठरतील. उत्साहाचे वातावरण राहील.
शुभ दिनांक - २९, ३१, ३, ४.
 
 
धनु (Sagittarius Zodiac) : मजबूत आर्थिक वाटचाल
Weekly Horoscope :  या आठवड्यातील ग्रहस्थिती आपली आर्थिक वाटचाल सुस्थितीत सुरू असल्याचे दर्शवीत आहे. राशिस्वामी गुरू सहाव्या कर्मस्थानातून आर्थिक त्रिकोण बळकट करीत आहे. चंद्र व्ययातून भ्रमण सुरू करीत असला, तरी लगेचच तो आपल्या राशीत येऊन बलवत्ता प्रदान करेल. आपली व क्षमता दर्शविणारी ही स्थिती आहे. या वाटचालीतूनच काही नव्या दिशा आपणास सापडून काही नवे उपक्रम सुरू करता येऊ शकतील. या सार्‍यात कोणाला जामीन राहण्याचा धोका मात्र पत्करू नका. कौटुंबिक गणित चांगले जमलेले राहील. कुटुंबात आनंद व उत्साहाचा सूर उमटलेला दिसेल. आप्तांचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक - ३०, १, ४.
 
 
मकर (Capricorn Zodiac) : प्रलंबित उपक्रमांना वेग
या आठवड्याच्या प्रारंभी लाभलेली ग्रहस्थिती आपणास अतिशय अनुकूल असणार आहे. राशिस्वामी धनस्थानी योगकारक शुक्रासोबत आहे, तर चंद्राचे भ्रमण लाभस्थानातून धनस्थापर्यंत असणार आहे. या ग्रहस्थितीचा पुरेपूर फायदा उचलण्याची गरज आहे. आपले प्रलंबित उपक्रम आता हातात घ्यावयास हरकत नाही. नोकरी-व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करावयास पाहिजे. यातून अपेक्षित साधता येईल. आर्थिक आवक वाढू शकेल. कलावंतांना संगीत, कला, नाट्य क्षेत्रात उत्तम संधी मिळू शकतील. कुटुंबात आनंदी व उत्साही वातावरण राहील. प्रवासाच्या, पर्यटनाच्या योजना आखता येतील.
शुभ दिनांक - ३१, १, ३, ४.
 
 
कुंभ (Aquarius Zodiac) : प्रगतीच्या मार्गाने वाटचाल
Weekly Horoscope :  राशिस्वामी शनी आपल्या राशिस्थानी असतानाच या आठवड्यात योगकारक ग्रह शुक्र त्याच्या सोबतीला याशिवाय चंद्र दशम स्थानातून भ्रमण सुरू करीत आठवड्याच्या शेवटी आपल्याच राशीत येणार आहे. ही उत्तम ग्रहस्थिती पाहता हा सप्ताह आपणास प्रगतिशील ठरू शकणार आहे. शिक्षण, संशोधन, क्रीडा, कला आणि न्याय क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांना प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करता येऊ शकेल. अनुभवी लोकांचा सल्ला, सहकार्‍यांची उत्तम मदत, आपली जिद्द यातून दीर्घकालीन पल्ला गाठण्यासाठीचा प्रवास या सुरू होऊ शकेल. या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम राहील.
शुभ दिनांक - २९, ३१, १, ३.
 
 
मीन (Pisces Zodiac) : पूर्वार्ध अतिशय उत्तम
Weekly Horoscope :  राशिस्वामी गुरू सध्या पराक्रम स्थानी असून त्याची भाग्यस्थानावर दृष्टी आहे. चंद्र दशम कर्म स्थानातून भ्रमण सुरू करणार असल्यामुळे या सप्ताहाचा पूर्वार्ध अतिशय उत्तम राहील, असे त्या मानाने उत्तरार्धात व्ययस्थानी शनी, शुक्रासोबत चंद्राची जमघट होणार आहे. त्यामुळे त्या काळात सारे काही आलबेल असेल असे दिसत नाही. काहींना आरोग्याची समस्या, मानसिक तणाव जाणवेल. काही गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात. अचानक मोठा खर्च समोर उभा ठाकू शकतो. नोकरी-व्यवसायात तडजोडीचे धोरण स्वीकारून आपली बाजू राखून ठेवण्याचा प्रयत्न करावा. काहीशी मंदी जाणवेल.
शुभ दिनांक - २९, ३०, ३१, १.
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, ८६००१०५७४६
Powered By Sangraha 9.0