कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के !

29 Dec 2024 13:39:41
कच्छ, 
महिनाभरातील हा तिसरा earthquake in kachch भूकंप आहे. या भूकंपामुळे लोक भयभीत झाले. मात्र, कमी तीव्रतेमुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. गुजरातमधील कच्छची जमीन पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. रविवारी सकाळी कच्छमध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. गांधी नगर येथील सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार, कच्छमध्ये सकाळी १०.०६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
 

earthquake in kachch 
 
 
तीनपेक्षा जास्त तीव्रतेचा तिसरा भूकंप
सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या earthquake in kachch म्हणण्यानुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू भचाऊच्या उत्तर-ईशान्येस १८ किलोमीटर अंतरावर होता. या महिन्यात जिल्ह्यात तीनपेक्षा जास्त तीव्रतेचा हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी २३ डिसेंबर आणि ७ डिसेंबरलाही कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 23 डिसेंबर रोजी कच्छमध्ये 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. 7 डिसेंबरलाही भूकंपामुळे कच्छची भूमी हादरली. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 मोजली गेली.
 
जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले
जम्मू-काश्मीरमध्ये earthquake in kachch शुक्रवारीही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार मोजली गेली. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात रात्री ९.०६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
 
तेलंगणात भूकंप
4 डिसेंबर रोजी तेलंगणातील earthquake in kachch मुलुगु येथे 5.3 तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. सकाळी ७.२७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. मुलुगुजवळील वारंगलमधील अनेक रहिवाशांनी सांगितले की, सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांना काही सेकंदांसाठी भूकंपाचे धक्के जाणवले. छताचे पंखे हलू लागले आणि कपाटातून वस्तू पडू लागल्या. मुलुगु राज्याच्या राजधानीपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे (एनजीआरआय) निवृत्त शास्त्रज्ञ पूर्णचंद्र राव म्हणाले की, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पाचपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप क्वचितच होतात.
Powered By Sangraha 9.0