शहरात नाकाबंदी, तर...‘थर्टी फर्स्ट’ थेट पोलिस कोठडीत

30 Dec 2024 21:51:29
- पाच हजार पोलिस अंमलदार तैनात
- पहाटे पाच वाजेपर्यंत बिअरबारला परवानगी
- मद्यपी, हुल्लंडबाजांवर कठोर कारवाई
 
नागपूर, 
'Thirty-first' police deployed सरत्या वर्षाला निरोप नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे नागपूर शहर सज्ज झाले आहे. नागरिकांच्या आनंदला गालबोट लागू नये म्हणून पोलिसही सज्ज झाले आहेत. अनेक तरुण-तरुणी उत्सवाच्या नावावर दारु पार्ट्यानंतर रस्त्यावर गोंधळ घालतात. मद्यप्राशन करुन वेगाने वाहने चालवितात परंतु, असा प्रकार आढल्यास त्यांचा ‘थर्टी फस्ट’ थेट पोलिस कोठडीत असणार आहे, सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवूनच आगमनाचे स्वागत करावे असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
 
 
police
 
(संग्रहित छायाचित्र ) 
 
अपघात टाळण्यासाठी सोमवारच्या सायंकाळपासूनच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पथक देखील रस्त्यावर तैनात आहे. ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह विरोधी मोहिम सुरू झाली आहे. या दरम्यान रॅश ड्रायव्हिंग, मद्यपी, हुल्लडबाज, छेडखानी करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
 
 'Thirty-first' police deployed शहरात ठिकठिकाणी हॉटेल्स, पब, क्लब, बिअर बार, ढाबे आणि फार्महाऊसमध्ये दारु पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. मद्यप्राशन करुन तरुण- तरूणी नव्या वर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे शहरात अपघात, भांडण, वाद, प्राणघातक हल्ले आणि अन्य गंभीर स्वरुपाच्या घटना घडतात. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनचालकांची ‘ब्रीथ मशिनने तपासणी करण्यात येणार आहे. तसेच वाहनाचीसुद्धा झडती घेण्यात येईल. दारु पिऊन वाहन चालविताना आढळल्यास त्यांची ‘थर्टी फस्ट’ची रात्र थेट पोलिस कोठडीत घालविण्यात येणार आहे. मद्यप्राशन करुन गोंधळ घालणारे किंवा वाहनांची स्पर्धा लावणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पार्टीचा परवाना घेतलेल्या हॉटेल्स, बार आणि अन्य आस्थापनांनी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या डीजे लावू नये. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जतन करुन ठेवावे. यावर्षी अपघात मुक्त आणि हिंसामुक्त शहर असा पोलिसांचा संकल्प असून त्यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे.
Powered By Sangraha 9.0