नाशिकच्या महिलेची दिग्रसवाल्याकडून ‘फसवणूक’ !

30 Dec 2024 12:27:27
तभा वृत्तसेवा
पुसद, 
नाशिकला Agricultural land sale case राहणाऱ्या महिलेची दिग्रसच्या व्यक्तीकडून फसवणूक झाली. या फसवणूक करणाऱ्याच्या  विरोधात पुसद शहर पोलिस ठाण्यात शनिवार, 28 डिसेंबर रोजी रात्री 11.43 वाजता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुभाष बलदेव पवार (38, दिग्रस) असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पुसद शहर पोलिस ठाण्यात सोनिया बाबुलाल जाधव (46, नाशिक) यांनी तक्रार दिली आहे. शहर पोलिस सूत्रांनुसार सुभाषने सोनियांकडून वडिलोपार्जित मिळालेली शेत जमीन 6 कोटी 75 लाख रुपये किंमतीत विकत घेण्याचे आमिष दाखविले होते.
 
 
sale
 
 
 
शेत जमिनीच्या Agricultural land sale case मोबदल्यात विशाल चव्हाण यांच्याकडून स्थावर जमीन व प्लॉटच्या अदलाबदलीचा करारनामा तयार करून नोटरी केली होती. त्या मोबदल्यात सोन्याकडून 0.04 हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनीची पुसद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ 47 लाख रुपये किंमतीची नमूद केली. खरेदी खताद्वारे महिलेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये देणे आवश्यक होते. परंतु असे असतानाही केवळ 10 लाख रुपये देऊन उर्वरित 1 कोटी 2 लाख रुपयांची रक्कम महिलेला न देता तीच जमीन परस्पर दिग्रस येथे राहणारे प्रभाकर बोंकिनपल्लेवार यांना विक्री केली. शेतजमीन विक्री प्रकरणी महिलेची फसवणूक झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केल्या जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0