नागपूर,
Athletics Championship महाराष्ट्र अॅथलेटिक्स स्पर्धा नागपूर विद्यापीठाच्या रवीनगर सिंथेटिक ट्रकवर पार पडल्या. यात ज्येष्ठांनीही तेवढ्याच हिरीरीने भाग घेतलेला दिसून आला. इतवारीत राहणार्या ७२ वर्षीय शशिकला माने यांनी २०० मीटरमध्ये (दौड) सुवर्ण पदक पटकावून उत्तम कामगिरी बजावली. शालेय जीवनात खो-खो चॅम्पियन राहिलेल्या माने यांनी उंच उडीत १.९४ मीटर उडीचा विक्रम केला. १५ दिवसांपूर्वी सिकंदराबाद येथे आयोजित स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण पदक पटकाविले होते.
खरबी रहिवासी ६२ वर्षीय स्नेहल विजय गंधवाल यांनी सुद्धा ६० वर्षीय वयोगटात शॉटपूटमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. स्नेहल या सुद्धा एकेकाळी पीटी उषासोबत स्पर्धेत भाग घेतलेली खेळाडू आहे. लग्नानंतर जबाबदार्या वाढल्याने काही कारणास्तव खेळ बंद झाले. काही वर्षांनी ईश्वर देशमुख कॉलेजच्या प्राचार्या शारदा नायडू सोबत भेट झाल्यानंतर पुन्हा मैदानावर येऊन पूर्ण केल्याचे त्या सांगतात.
Athletics Championship दाभामध्ये किरायाने राहणारे सुरक्षा रक्षक असलेले ७२ वर्षीय गोपाल डफ यांनी सुद्धा ३ सुवर्ण पदक पटकावले. १०० मीटर १५ सेकंदात, २०० मीटर ३३.५ सेकंदात व ४०० मीटर १.१४ सेकंदात पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकाविले. सकाळी फिरण्याचा शौक असलेले गोपाल यांनी जवळच्या क्लबमध्ये सहजच प्रवेश घेतला तेथून प्रेरणा घेत आज मी सुवर्ण पदक घेऊन शकलो, असे ते सांगतात.
१०० मी.मध्ये आदर्श ५व्या स्थानावर
नागपूर : गतवर्षी चेन्नईत १०० मीटर रेसमध्ये रौप्य पटकविणारा नागपूर विद्यापीठाचा आदर्श भुरेला यावर्षी भुवनेश्वरला झालेल्या ८४व्या अखिल भारतीय आंतरविवि अॅथलेटिक्समध्ये ५व्या स्थानावर समाधान मानावे लागले. यामुळे पुढील वर्षी खेळल्या भारतीय विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. मागच्या वर्षीच्या खेलो इंडिया टुर्नामेंटमध्ये कांस्य पदक जिंकले होते. आदर्शने अंतिम फेरीत १०.६६ सेकंद वेळ नोंदविली. पुरुषांच्या ३०० मीटर स्टीपलचेस रेस मध्ये सौरव तिवारी अंतिम फेरीत पोहोचला.