गरुड पुराणातील या पाच गोष्टी करा

30 Dec 2024 16:02:42
Garuda Purana शास्त्रानुसार जन्म घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यूही निश्चित असतो आणि नेहमीप्रमाणे मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून नवीन ठिकाणी प्रवेश करते. गरुड पुराणात जन्म व मृत्यूशी संबंधित अशाच गोष्टींचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मातील लोकांना मृत्यूनंतर गरुड पुराणाचे ज्ञान असणे सर्वात महत्त्वाचे आहे. हे सहसा कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर पाठ केले जाते. याशिवाय धर्म, व्रत व उपासनेचे नियमही ते स्पष्ट करतात.
 
GARUD PURAN 
 
 
 
गरुड पुराणातील ५ महत्त्वाच्या गोष्टी
पहाटे लवकर Garuda Purana  उठण्याचा प्रयत्न करा - गरुड पुराणात व्यक्तीने सकाळी लवकर उठले पाहिजे असे सांगितले आहे. कारण यानुसार सकाळी वातावरणात शुद्ध हवा येते, जी व्यक्तीच्या आरोग्यासाठी चांगली असते. रोगांपासून आराम मिळतो आणि यामुळे व्यक्तीचा संपूर्ण दिवस चांगला जातो. याशिवाय, गरुड पुराणात सांगितले आहे की, जो व्यक्ती जास्त वेळ झोपतो, त्याचे वय कमी होत जाते जे त्याच्यासाठी अशुभ लक्षण आहे
.
यशासाठी झटत राहा - आयुष्यात अनेक वेळा खूप काम करूनही माणसाला यश मिळत नाही. त्यामुळे, तो निराश व अस्वस्थ होतो आणि काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. पण गरुड पुराणात सांगितले आहे की, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी माणसाने स्वतःला निराश होऊ देऊ नये. एखादी माणूस मूर्ख असेल परंतु,त्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असेल तर असा माणूस देखील प्रयत्नांनी यश मिळवू शकतो.

चुकीच्या संगतीपासून अंतर ठेवा - आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून सांगितले आहे की, आपण चुकीच्या संगतीच्या लोकांमध्ये राहू नये किंवा त्यांच्याशी मैत्री करू नये. परंतु, तरीही माणूस त्यांच्याशी मैत्री करतो. म्हणून गरुड पुराणात म्हटले आहे की, मित्र बनवण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या आचार-विचाराची नीट चौकशी करावी जेणेकरून नंतर मैत्रीत कोणतीही अडचण येऊ नये. माणसाने असा मित्र बनवला पाहिजे जो इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकेल व ज्याची इर्ष्या भावना नसेल.
ज्ञान व कलेचा Garuda Purana कधीही अभिमान बाळगू नका - ज्ञान व कला या दोन गोष्टी आहेत ज्यांचा माणसाने कधीही अति अभिमान बाळगू नये. कारण ही खासियत दुर्मिळ लोकांमध्येच आढळते. म्हणून गरुड पुराणात असे म्हटले आहे की, या दोन्ही गोष्टी फक्त त्या लोकांनाच मिळतात ज्यांच्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो. जगात या गोष्टींचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर माता सरस्वतीचा कोप होतो व त्यामुळे त्या व्यक्तीचे सर्व ज्ञान हळूहळू अधोगतीकडे जाऊ लागते.
नेहमी व्यवस्थित Garuda Purana व  स्वच्छ कपडे परिधान करा – गरुड पुराणात सांगितले आहे की, माणसाने नेहमी स्वच्छ व सुगंधित कपडे घालावेत. घाणेरडे कपडे घालणाऱ्यांवर माता लक्ष्मीचा कोप होतो. स्वच्छ कपडे परिधान करणे ही एक चांगली वागणूक म्हणून ओळखली जाते ज्यामुळे, व्यक्तिमत्त्वात एक वेगळी चमक येते.
Powered By Sangraha 9.0