महाराष्ट्रात मुलींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट

30 Dec 2024 18:51:11
Kidnapping plan असे अनेक चाहते आहेत ज्यांना त्यांच्या स्टार्सबद्दल वेगळीच क्रेझ असते. के-पॉप बँड बीटीएसच्या डाय हार्ट चाहत्यांमध्येही असेच दिसून आले. आपल्या आवडत्या बँडच्या सदस्यांना भेटण्यासाठी तीन तरुणींनी स्वतःला पळवून नेण्याचा कट रचल्याची घटना महाराष्ट्रात घडली आहे. त्यानंतर, पोलिसांनी मुलींची चौकशी केली असता त्यांनी त्यांचा संपूर्ण प्लॅन सांगितला. महाराष्ट्रातील संभाजी नगरमध्ये ही घटना घडली असून, ही घटना ऐकून सर्वांना धक्का बसला आहे.
 
 

bts 
 
 
सूत्रांच्या Kidnapping plan माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी एका व्यक्तीने धाराशिव पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला. जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तीन मुलींना जबरदस्तीने स्कूल व्हॅनमध्ये नेण्यात आल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे. तिन्ही मुलींना व्हॅनमध्ये एक महिला घेऊन जात होती. उमरगाहून पुण्याला जाणाऱ्या परिवहन बसमधून ही महिला प्रवास करत होती. यातील एक मुलगी १३ वर्षांची होती तर इतर दोन मुली १४ वर्षांच्या होत्या. त्या मुली पुण्यात पैसे कमावण्याच्या बेतात होत्या. यानंतर त्यांना हे पैसे घेऊन दक्षिण कोरियाला जाऊन त्यांच्या आवडत्या बँड BTS पॉप बँडच्या सदस्यांना भेटायचे होते. मुलींचा हा प्लान ऐकून पोलीसही चकित झाले.
त्यानंतर पोलिसांनी Kidnapping plan कारवाई करत तिन्ही मुलींना सुखरूप बाहेर काढले. महिलेच्या मदतीने तिन्ही मुलींना बसमधून खाली उतरवून स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर मुलींच्या पालकांनीही पोलिसांच्या ताफ्यासह पोलिस ठाणे गाठले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या तीन महिलांची चौकशी केली. यावेळी मुलींनी सांगितले की, त्यांना बीटीएस पॉप बँड खूप आवडतो आणि त्यांना या बँडच्या मेम्बर्सला भेटायचे आहे. दक्षिण कोरियाला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळेच,त्या पैसे कमावण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. बीटीएस पॉप बँडबद्दल बोलायचे तर, त्याचा फुलफॉर्म बैंगटान बॉईज आहे. त्याची सुरुवात २०१० साली झाली. त्यांचे फॉलोवर्स संपूर्ण जगात आहेत.
Powered By Sangraha 9.0