नागपूर,
Platform Ticket मावळत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी जाणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी येणार्या व्यक्तींची संख्या अधिक असते. त्यामुळे, रेल्वेस्थानकावर गर्दी उसळते. हीच बाब लक्षात घेवून, मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावर २ जानेवारीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
रेल्वेस्थानकावरील Platform Ticket अतिरिक्त गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद असली तरी एकट्याने प्रवास करणार्या वृद्ध, ज्येष्ठ नागरिक,आजारी व्यक्ती, लहान मुले, व्यक्ती व महिला प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी येणार्या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने Platform Ticket नागपूरसह १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांमधील अनुभव लक्षात मध्य रेल्वे प्रशासनाने तात्पुरते निर्बंध आणले आहेत. हे निर्बंध २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील. त्यामुळे, प्रवाशांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती स्थानकात प्रवेश करू शकणार नाही.