Smile depression स्माईल डिप्रेशन ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये, एखादी व्यक्ती आपले आंतरिक दुःख व तणाव लपवण्यासाठी बाहेरील जगासमोर नेहमी हसत असते. या स्थितीत, एखादी व्यक्ती आपले दुःख लपवून सर्वांसमोर आनंदी दिसण्याचा प्रयत्न करते, आतून ती व्यक्ती नैराश्याशी झुंजत असतो, त्याला सामोरे जाणारे लोक सामाजिक दबावामुळे किंवा इतरांचा आनंद टिकवण्यासाठी अनेकदा आपल्या भावना लपवतात.
एका Smile depression अहवालानुसार, स्माईल डिप्रेशनच्या काही सामान्य लक्षणांमध्ये जास्त झोपणे, ऊर्जेची कमतरता व जास्त खाणे यांचा समावेश असतो. याशिवाय, चेहऱ्यावर स्मितहास्य राखूनही व्यक्तीला एकटेपणा व नैराश्य जाणवते. बऱ्याच वेळा हे लोक त्यांना होत असलेल्या वेदनांबद्दल इतरांना सांगण्यास घाबरतात. ज्यामुळे, समस्या आणखी वाढते.
स्माइल डिप्रेशन Smile depression केवळ मानसिक आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही तर शारीरिक आरोग्यावरही त्याचा खोल परिणाम होतो. याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो तसेच व्यावसायिक जीवनातही समस्या निर्माण होऊ शकतात. सतत भावना लपविल्यामुळे माणसाला थकवा व तणाव जाणवतो. या परिस्थितीमुळे कधी कधी आत्महत्येसारखे धोकादायक विचारही येऊ शकतात.
त्यावर उपचार कसे करावे?
स्माईल डिप्रेशनवर Smile depression योग्य वेळी उपचार करता येतात. यासाठी, व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त करणे आणि मानसिक आरोग्य तज्ञाची मदत घेणे महत्वाचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व ध्यान यासारखे उपाय देखील उपयुक्त ठरू शकतात. या परिस्थितीतून सावरण्यासाठी कुटुंब व मित्रांचे समर्थन देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.