The Sabarmati Report ‘द साबरमती रिपोर्ट’ हा एक राजकीय नाटक चित्रपट आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसीने समर कुमारची भूमिका साकारली आहे. तर राशि खन्नाने अमृता गिलची तसेच रिद्धी डोगराने मनिका राजपुरोहितची भूमिका साकारली आहे, हा चित्रपट देशातील सर्वात मोठ्या घटनेवर आधारित आहे. पीएम मोदींनीही हा चित्रपट पाहिला होता आणि त्याचे खूप कौतुक केले होते.
OTT वर ‘द साबरमती रिपोर्ट’ कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?
'द साबरमती The Sabarmati Report रिपोर्ट' १५ नोव्हेंबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षक दोघांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. लाइव्ह मिंट रिपोर्टनुसार, विक्रांत मॅसी स्टारर द साबरमती रिपोर्ट १० जानेवारी २०२५ रोजी ZEE5 वर प्रीमियर होईल. धीरज सरना दिग्दर्शित हा चित्रपट २००२ मध्ये साबरमती एक्स्प्रेसच्या गोधरा ट्रेन जळीतकांडावर आधारित आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही.
काय आहे ‘द साबरमती रिपोर्ट’ची कथा?
‘द साबरमती The Sabarmati Report रिपोर्ट’ हा एका पत्रकारावर आधारित आहे जो २००२ मध्ये गुजरातमधील गोधरा ट्रेन आगीची चौकशी करतो. चित्रपटाची कथा एक मोठे वळण घेते जेव्हा दुसऱ्या पत्रकाराला अनेक वर्षांनी घटनेशी संबंधित एक छुपा अहवाल सापडतो. सामर्थ्यवान लोकांशी संबंधित कट आणि छुपे सत्य उघड करण्याचा निर्धार करून, तो न्यायाच्या शोधात निघतो. समाजातील पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आणि सत्य उलगडण्याचा प्रयत्न करताना त्यांना कोणकोणत्या धोक्यांना सामोरे जावे लागते यावरही चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
साबरमती रिपोर्ट कास्ट आणि क्रू
विक्रांत मॅसी, राशी The Sabarmati Report खन्ना, रिद्धी डोगरा, सुदीप वेद, हेला स्टिचलमेयर, दिग्विजय पुरोहित, अभिशांत राणा, उर्वशी गौल्टर यांच्यासह अनेक कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अर्जुन भांडेगावकर, धीरज सरना, विपिन अग्निहोत्री आणि अविनाश सिंग तोमर यांनी लिहिलेल्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर, अंशुल मोहन व अमूल व्ही मोहन यांनी बालाजी मोशन पिक्चर्स, विपिन अग्निहोत्री फिल्म्स आणि विकीर फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली केली आहे . चित्रपटाचे छायाचित्रण अमलेंदू चौधरी यांनी केले आहे.