गोवंशाची अवैध वाहतूक रोखली

30 Dec 2024 19:27:12
तभा वृत्तसेवा
देवळी, 
रात्रीच्या cow trafficking  सुमारास गस्तीच्या वेळी सतर्कता बाळगल्यामुळे गोवंशाची क्रूरपणे होणारी अवैध वाहतूक रोखण्यात देवळी पोलिसांना यश आले आहे. बोलेरो गाडीमध्ये निर्दयपणे कोंबलेल्या गोवंशाची सुटका करून पोलिसांनी राहुल घावट रा. हिंगणघाट याला अटक करून बोलेरो गाडी जप्त केली.
 
 

cow trafficking 
 
 
मिळालेल्या cow trafficking  माहितीनुसार, चौपदरी महामार्गावर रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी देवळी दरबार रेस्टॉरंटसमोर गुप्त माहितीच्या आधारे एम. एच. 32 ए. जे. 5332 वाहनाला रोखून तपासणी केली असता त्यात दोन बैल, तीन गाई व एक गोर्‍हा अशा सहा गोवंशाला क्रूरपणे कोंबून असल्याचे आढळून आले. चौकशी केली असता वाहतूक परवानगीचे कोणतेही कागदपत्र चालक सादर करू शकला नाही. त्यामुळे देवळी पोलिसांनी कारवाई करून पडेगाव येथील सर्वोदय गोशाळेत गोवंशाची रवानगी केली. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल डाहुले यांच्या मार्गदर्शनात गजानन महाकाळकर, पंकज चामचोर, संदीप वानखेडे व रवी डहाके यांनी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0