हृतिक रोशन त्याच्या पहिल्या पत्नी व तिच्या प्रियकरासह दुबईत

सबा आझादसोबतचे फोटो व्हायरल

    दिनांक :31-Dec-2024
Total Views |
Hrithik Roshan Holiday नवीन वर्ष येणार आहे आणि बॉलिवूड सेलिब्रिटी पार्टीच्या मूडमध्ये आहेत. नववर्ष साजरे करण्यासाठी बहुतेक सेलिब्रिटी सहलीला गेले आहेत. हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट वॉर २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आता शूटिंगमधून वेळ काढून तो दुबईला फॅमिली व फ्रेंड्ससोबत फिरायला गेला आहे. हृतिकसोबत त्याची पहिली पत्नी सुजैन खान, तिचा प्रियकर अर्सलान गोनी, गर्लफ्रेंड सबा आझाद व मुलगा हृधन देखील आहे. त्यांच्या या प्रवासाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
 
photo
 
 
 
सुजैन खानने Hrithik Roshan Holiday तिच्या या ट्रिपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये, अर्सलान, हृतिक, उदय चोप्रा, सबा आझाद व मुलगा हृदन दिसत आहेत. ग्रुप फोटो शेअर करताना सुझैनने लिहिले - हे सारे ग्लिटर गोल्ड पेक्षा जास्त चमकत आहेत. कौटुंबिक टाय. तिने फोटोमध्ये सर्वांना टॅग केले आहे.
संपूर्ण कुटुंब Hrithik Roshan Holiday सहलीत एकत्र मजा करत आहे. सुझानचा भाऊ झायेद खान, नर्गिस फाखरी, टोनी बिझ हे देखील तिच्यासोबत ट्रिपमध्ये आहेत. झायेदची मुलं आणि सुझानची मुलं एकत्र खूप मजा करत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.हृतिक रोशन व सुजैन खान लग्नाच्या १४ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. दोघांनी २००० साली लग्न केले. २००६ मध्ये सुझैनने मुलगा रिहानला जन्म दिला. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी मुलगा हृदनचे स्वागत केले. २०१४ मध्ये हृतिक व सुझैन वेगळे झाले. त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्काच बसला.
हृतिक रोशन Hrithik Roshan Holiday लवकरच वॉर 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.