बांगलादेश सरकारवर हिंदू अल्पसंख्यकांच्या संरक्षणाची जबाबदारी

    दिनांक :04-Dec-2024
Total Views |
- अमेरिकी खासदाराचे मत
 
वॉशिंग्टन, 
Protection for Hindus in Bangladesh : या वर्षाच्या सुरुवातीला लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर बांगलादेशात सत्तेत आलेल्या अंतरिम सरकारवर हिंदू संरक्षणाची जबाबदारी आहे, असे मत एका प्रभावशाली अमेरिकी खासदाराने मंगळवारी व्यक्त केले. आठवड्याच्या शेवटी बांगलादेशातील हिंदूंनी चिन्मय प्रभू यांची सुटका आणि बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळावे या मागणीसाठी व्हाईट हाऊससमोर निदर्शने केली. हिंदू अल्पसंख्यकांचे रक्षण करणे आणि अलिकडेच झालेले हल्ले व छळाच्या विरोधात हजारो हिंदू अल्पसंख्यकांनी केलेल्या आंदोलनावर योग्य तोडगा जबाबदारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर आहे, असे काँग्रेस सदस्य ब्रॅड शेरमन यांनी एका निवेदनात म्हटले.
 
 
 Bangladesh Hindus
 
Protection for Hindus in Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पतनापूर्वी आणि त्यानंतर झालेल्या हत्या आणि इतर अधिकाराच्या उल्लंघनासाठी बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन एकता परिषद आणि संयुक्त राष्ट्र मानवीहक्क उच्चायुक्त वोल्क तुर्क यांच्याकडे तपासाची मागणी तसेच वर्तमान सत्ताधार्‍यांनी हिंदू विरोधातील हिंसाचार संपुष्टात आणला पाहिजे असे शर्मन यांनी सांगितले. बांगलादेशात मुस्लिम कट्टरवादी हिंदूंच्या विरोधात करीत असलेल्या हिंसाचाराला रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन हिंदू अ‍ॅक्शनचे कार्यकारी संचालक उत्सव चक्रवर्ती यांनी बायडेन प्रशासनाला केले आहे. अंतरिम सरकारने अटक केलेले चिन्मय प्रभू यांना तुरुंगात मोठा धोका असल्याची माहिती आम्हाला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.