मुंबई,
Reliance Jio-Maharashtra भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ महाराष्ट्रच्या वतीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ अवॉर्ड्सचे आयोजन केले होते. रोजच्या धकाधकीच्या आणी धावपळीच्या जगात सर्वात महत्वाचे असलेल्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. Reliance Jio-Maharashtra कामाच्या ताणामुळे तसेच बैठ्या जीवनशैलीमुळे बऱ्याच वेळी कमी वयात नको ते आजार मागे लागतात हे सर्व टाळण्यासाठी आणि कर्मचायांमध्ये आरोग्याप्रती जागृती निर्माण करण्यासाठी या अवॉर्ड्सचे आयोजन केले जाते. या आरोग्य पुरस्कारांमध्ये गुड हेल्थ अवॉर्ड, हेल्थ इम्प्रुव्हमेंट अवॉर्ड यासारख्या विविध कॅटेगरीचा समावेश होता.
Reliance Jio-Maharashtra ज्या कर्मचाऱ्यांनी आपली जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आपल्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा घडवून आणली अशा कर्मचाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कर्मचाऱ्यांमध्ये जिओ तसेच संलग्न कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यावेळी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांनी आपला अनुभव इतरांना सांगून त्यांना प्रोत्साहित केले. या अवॉर्ड्सचे आयोजन रिलायन्स जीओ महाराष्ट्रच्या मेडिकल टीमच्या वतीने करण्यात आले . या कार्यक्रमाला रिलायन्सचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. राजेश यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. बसूराज कट्टीमनी, अमृत केसरकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून अधिकाधिक कर्मचाऱ्यांनी यात भाग घ्यावा अशी विनंती केली.
Reliance Jio-Maharashtra यावेळी जिओचे बिझनेस हेड सतीश शर्मा, एच.आर. प्रमुख सौमित्र गर्गे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. एक जबाबदार कंपनी असलेल्या जिओच्या वतीने कामाव्यतिरिक्त नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी संपूर्ण मेडिकल तपासणी, रक्तदान शिबीर, फायब्रॉईड स्कॅन, मधुमेह तपासणी आणि आरोग्याशी निगडित विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. नुकताच जीओला ग्रेट प्लेस टू वर्क हा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे .