मानोरा,
crop failure crisis तालुक्यातील शेती पारंपारिक शेणखतांचा मोठ्या प्रमाणात अभाव आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापरामुळे शेत जमीनीतील मातीचा दर्जा पूर्णपणे खालावला असून, असेच सुरू राहिल्यास नापिकीचे संकट दूर नसल्यामुळे शेतकर्यांना या घोंगावणार्या संकटापासून वाचण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार वसंत नगर, पिंपळसेंडा आणी गव्हा ह्या गावातील शेतकर्यांनी केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत गावपातळीवरील पाहिले शेतकरी प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कार्यालय मानोरा यांच्या पुढाकाराने नुकतेच घेण्यात आले.
crop failure crisis जय सेवालाल महाराज नैसर्गिक शेतकरी गट वसंत नगर, जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेतकरी गट पिंपळशेंडा आणि गव्हा येथील आप्पास्वामी नैसर्गिक शेतकरी गट व अंबिका नैसर्गिक शेतकरी गटातील शेतकर्यांनी यात सहभाग नोंदविला. मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी प्रस्तावनेत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती संकल्पना, महत्व, योजना, गट स्थापनेचा उद्देश, पीएफओ स्थापने विषय माहिती, शेअर जमा करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शंभूराज ताटे यांनी जिवामृत, बिजामृत, निंबोळी अर्क,तांदूळपाणी,सोयाबीन टॉनिक, अंडे जनित अमिनो आम्ल, बायोडायनामीक तरल खत प्रात्यक्षिक व सविस्तर मार्गदर्शन केले. अनिसा महाबळे प्रकल्प संचालक आत्मा वाशीम यांनी जैविक बांध, चर खोदणे, पीक फेरबदल, पीक नियोजन व सेंद्रिय प्रमाणीकरण बाबत मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर खोडके या शेतकर्याने नैसर्गिक शेती याविषयी त्यांचे अनुभव सांगितले. प्रशिक्षण शिबिरामध्ये १६१ शेतकर्यांनी हजेरी लावली. यावेळी अजय मोरे प्रकल्प उपसंचालक आत्मा वाशीम, संतोष थोरात तंत्र अधिकारी वाशीम, रोशन भागवत तालुका कृषी अधिकारी मानोरा हे मान्यवर उपस्थित होते.