आता शेतकर्‍यांना आधारप्रमाणे मिळणार ‘फार्मर आयडी’ !

शेतकर्‍यांना आधार सारखाच

    दिनांक :06-Dec-2024
Total Views |
गोंदिया, 
एक युनिक आयडी क्रमांक Farmer ID देण्यात येणार आहे. आयडीत सरकार शेतकर्‍यांची माहिती एकत्र करणार आहे. जर तुमच्या नावावर जमीन असेल तरच तुम्हाला ‘फार्मर आयडी’ मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीच्या नोंदी, गावाचे नकाशे यांच्या नोंदी डिजिटल केले जाणार आहेत. ज्यामुळे शेतकर्‍यांना सेवा आणि सुविधा त्यातून मिळू शकतील. त्यासोबतच शेतकर्‍यांसाठी डिजिटल एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे. त्यातून पीक संरक्षण, जमिनीचे आरोग्य आदींची माहिती एकत्र मिळेल.
 

farmer id gondia 
 
 
गोंदिया जिल्ह्याची अर्थव्यवस्था Farmer ID शेतीवरच आश्रीत असल्याचे म्हटले जाते. जिल्ह्यात 2 लाख 72 हजार शेतकरी आहेत. शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनानच्या अनेक योजना आहेत. सध्या शेतकर्‍यांना कृषी योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रत्येकवेळी पडताळणी करावी लागते. त्यात खर्च होते. तसेच शेतकर्‍यांना संबंधित कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कधी कागदपत्र वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना मनःस्ताप सहन करावा लागतो. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणून प्रत्येक शेतकर्‍यांना युनिट आयडी देण्याचा संकल्प शासनाने केला आहे. शेतकर्‍यांना 'फार्मर आयडी' अनेक कामासाठी उपयुक्त ठरणार असून त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. शेतकर्‍यांना आधारकार्डसारखे स्वतंत्र ओळखपत्र वाटप करण्यात येणार आहे. यासाठी महसूल विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कोणत्या प्रकारची पेरणी करायची? बी- बियाणे कोणते वापरायचे? कधी लागवड करायची? कापणी कधी करायची? याबाबतचे मार्गदर्शन ‘फार्मर आयडी’ च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेती क्षेत्रात डिजिटल सिस्टीम तयार झाल्यामुळे देशातील शेतकर्‍यांच्या जमिनीचा रेकॉर्ड त्यासोबत जोडला जाणार आहे. शेतकर्‍यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी सरकारला उपयोगी होणार आहे.