काय सांगता...राज्यसभेत सापडला नोटांचा गठ्ठा!

06 Dec 2024 11:43:23

gubad
 
नवी दिल्ली,
bundle of notes Rajya Sabha नोटांचे बंडल सापडल्याने आज राज्यसभेत गदारोळ झाला. काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या जागेवरून ही नोट जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. अध्यक्ष जगदीप घनखर यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी तपास होईपर्यंत नावे घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणावर अभिषेक मनू सिंघवी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभेत नोटांचे बंडल सापडल्याच्या आरोपावर काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस खासदार म्हणाले, 'मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे. आजपर्यंत कधीच ऐकले नव्हते. ' हेही वाचा : "चंद्रावर पोहोचण्याची इच्छा पूर्ण होत नाही"...नासाचे अभियान पुन्हा अयशस्वी !
Powered By Sangraha 9.0