असा असावा शिष्याेत्तम !

07 Dec 2024 15:15:49
वेध 
 
 
 - हेमंत सालोडकर 
 
 
Sachin-Vinod-Acharekar जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार देतात. यशस्वी जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असताे. संस्कारासाठी आपल्याला गुरूही चांगला लाभला पाहिजे. चांगले विचार असणारा गुरूच उत्तम गुण आपल्या शिष्यामध्ये प्रवाहित करताे. मग त्यासाठी शिष्यही सर्वाेत्तम असावा लागताे. आपल्याकडे गुरुकुल पद्धती हाेती. Sachin-Vinod-Acharekar त्यात शिष्य गुरूकडे विद्या प्राप्त करीत असत. आधुनिक युगातही गुरू-शिष्य पद्धती सुरू आहे. पण अलिकडे नाव घेता येईल अशी गुरू-शिष्य जाेडी म्हणजे क्रिकेटचे महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर आणि सर्वाेत्तम शिष्य सचिन तेंडुलकर हाेय. अगदी लहान वयापासून सचिन रमाकांत आचरेकरांकडे क्रिकेटचे धडे गिरवू लागला. Sachin-Vinod-Acharekar त्यासाठी पहाटे उठण्यापासून दिवसभराचे वेळापत्रक ठरलेले असायचे. त्यानुसार सराव करून सचिनने क्रिकेट जगतात आपले आणि देशाचेही नाव उंचावले.
 
 
 

Sachin-Vinod-Acharekar 
 
 
 
 
यासाठी आचरेकरांसारखे गुरू लाभावे लागतात हे खरे असले, तरी सचिनसारखा सर्वाेत्तम शिष्यही गुरुचरणी लीन हाेणे आवश्यक असते. हे सर्व संस्कारांमुळेच शक्य आहे. रमाकांत आचरेकरांकडे सचिनसाेबतच विनाेद कांबळीही क्रिकेटचे धडे घेत हाेता. Sachin-Vinod-Acharekar दाेघेही एकाच प्रशिक्षकाकडून क्रिकेटचे संस्कार अर्थात धडे घेत असतानाच सचिनने जागतिक कीर्ती मिळवली तर विनाेद कांबळी आज जवळपास विस्मरणात गेला आहे. काही दिवसांपूर्वी रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे उद्घाटन मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आचरेकरांचे सचिन आणि विनाेद हे दाेन्ही शिष्य व्यासपीठावर उपस्थित हाेते. दाेन्ही शिष्य असले तरी सचिनला तेथे मध्यभागी मानाचे स्थान मिळाले हाेते, तर विनाेद कांबळीला अगदी काेपऱ्यात ठेवण्यात आले हाेते. ही स्थिती का निर्माण झाली याचा विचार विनाेद कांबळीने करणे गरजेचे हाेते. आपल्याच साेबत असलेल्या सचिनला मानाचे स्थान मिळाले असताना माझ्यावर ही स्थिती का ओढवली, यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
 
 
 
 
यासाठी गुरू जरी चांगला असला, तरी शिष्यही त्याच ताेडीचा असणे आवश्यक आहे. सचिनने आपल्या संस्कारांनी आज क्रिकेट जगतात आणि इतरही क्षेत्रांत नाव कमावले आहे. त्याने धावांचा पाऊस तर पाडलाच; पण आपल्या संस्कारांनी आणि वागणुकीने लाेकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षावही केला आहे. ताे दिवसेंदिवस वाढतच आहे. सचिनच्या यशाचे रहस्य त्याच्या संस्कारात आहे, असेच म्हणावे लागेल. Sachin-Vinod-Acharekar एक चांगला माणूस व आदर्श नागरिक बनण्याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. चांगल्या सवयीचे आणि चांगल्या संस्काराचे महत्त्व पटवून द्यायला पाहिजे. संस्कार म्हणजे गुणांचे वर्धन आणि दाेषांचे निर्दालन करणे हाेय. महाभारतात कर्णही शिष्याेत्तम हाेता. ताेही पांडवच हाेता. पराक्रमी हाेता. पण अधर्मी दुर्याेधनाच्या नादी लागल्याने त्याचा नि:पात झाला. दुर्याेधनाच्या प्रत्येक पापामध्ये त्याने साथ दिली आणि स्वत:चा विनाश करून घेतला. 
 
 
 
 
 
तसेच विनाेद कांबळीचेही झाले. क्रिकेटमध्ये लहान वयात अनेक विक्रम आपल्या नावावर करूनसुद्धा त्याला यश पचवता आले नाही. यशामुळे मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून मिळणारा पैसा यामुळे ताे नकाे त्या भानगडीत पडला आणि क्रिकेटकडे दुर्लक्ष झाले. यशाेशिखरावरून थेट जमिनीवर आदळला ताे कायमचाच. Sachin-Vinod-Acharekar दुसरीकडे सचिन तेंडुलकर हळूहळू यशाची शिखरे पादाक्रांत करत हाेता. ताे परिपक्व हाेत असतानाच तेवढाच विनम्र झाला. त्याचा ायदा त्याला क्रिकेट आणि त्याच्या आयुष्यातही झाला आणि ताे क्रिकेट रसिकांचा रमाकांत आचरेकरांचा शिष्याेत्तम ठरला. याच शिष्याने आपल्या गुरूला आदरांजली म्हणून दादर येथील शिवाजी महाराज पार्क मैदानातील गेट क्रमांक 5 येथे स्मारक उभारले. एका शिष्याने आपल्या गुरूसाठी आणखी काय करावे.
 
 
 
एकीकडे सचिन गुरूसाठी स्मारक उभारत असताना विनाेद कांबळी आयुष्याची शर्यत कशीतरी पूर्ण करत आहे. या स्मारकाचे अनावरण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्मारकाचे सल्लागार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे आणि सचिनने उपस्थितांना संबाेधित केले. Sachin-Vinod-Acharekar राज ठाकरे यांनी यावेळी आचरेकर सरांचा पुतळा उभारण्याऐवजी स्मृती स्मारकच का उभारले, या मागचे रहस्यही सांगितले. पुतळ्याऐवजी प्रतीकात्मक स्वरूपात बॅट, यष्टी, ग्लाेव्हज यावर आचरेकर सरांची ओळख असलेली कॅप ठेवत हे स्मारक आता सर्वांना प्रेरणा देत राहणार आहे. यशाच्या शिखरावर असतानाही सचिन तेंडुलकर आपल्या मित्राला अर्थात विनाेद कांबळीला विसरला नाही. त्याने कार्यक्रमात विनाेदची विचारपूस केली. असा हा सचिन शिष्याेत्तम ठरला. 
 
 
9850753281
Powered By Sangraha 9.0