काेत्या वृत्तीचे!

can EVM get hacked निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न

    दिनांक :07-Dec-2024
Total Views |
मुंबई वार्तापत्र 
 
 
can EVM get hacked महाराष्ट्राला एक माेठा समृद्ध राजकीय वारसा आहे. राजकीय विचारांची संस्कृती आणि संस्कार आहेत. जे यशवंतराव चव्हाणांपासून 2019 पर्यंत आजचे राजकारणी नेटाने जाेपासत आलेत. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हायची, वैचारिक मतभेद असले तरी, वैयक्तिक हेवेदावे, शत्रुत्व असे काेणी कधीही केल्याचे ऐकिवात नाही. महाराष्ट्रातील राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण असायचे, किंबहुना आहे. अशा पद्धतीचे ‘हेल्दी पाॅलिटिक्स’ महाराष्ट्राचे हाेते. can EVM get hacked पण महाराष्ट्र या अत्यंत प्रगल्भ आणि सुसंस्कृत राजकीय परंपरेला गालबाेट लावण्याचं काम यावेळी विराेधकांनी केलं आहे. लाेकशाही मार्गानं आलेल्या सरकारच्या सरकारी साेहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर करून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या काेत्या मनाेवृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
 
 
 
 

can EVM get hacked 
 
 
 
 
संविधान आणि लाेकशाही वाचविण्याचे ढाेंग करणाऱ्या मविआच्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने संसदीय लाेकशाहीचा पायाच नष्ट करण्याचा घाट घातल्याचे चित्र दिसत आहे. can EVM get hacked एकीकडे आपणच लाेकशाही वाचविण्याचा डांगाेरा पिटायचा आणि लाेकशाहीतील स्तंभांना खिळखिळे करण्याचं, नष्ट करण्याचं षडयंत्र रचायचं. बरं हे सगळं कशासाठी तर आपला राजकीय उल्लू सिधा करण्यासाठी. लाेकशाही मार्गानं जनतेनं निवडून दिलेल्या सरकारच्या समारंभावर बहिष्कार म्हणजे, लाेकशाहीवर अविश्वास दर्शविण्याचा प्रकार विराेधकांनी केला. यापूर्वी विराेधकांनी न्यायालये आणि निवडणूक आयाेगासारख्या घटनात्मक संस्थांवर सातत्याने अविश्वास दर्शविला. कारण काय तर, केवळ निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून. पराभव पचवता न येणाऱ्या या विराेधी पक्षांच्या नेत्यांनी मग आपल्या अपयशाचं खापर ईव्हीएम, संवैधानिक संस्थांवर फोडून या संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला.
 
 
 
 
मात्र, त्याचवेळी उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य, या रणसंग्रामात नवखा असलेला मावसभाऊ वरुण सरदेसाई, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्यासह 20 लाेक निवडून आले आहेत. दुसरीकडे शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 16 आमदार निवडून आले आहेत. तेदेखील याच ईव्हीएमद्वारे घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून. महाराष्ट्रासाेबत झारखंडची सुद्धा निवडणूक ईव्हीएमद्वारेच झाली. तेथे भाजपा चांगलीच माघारली. पाहिजे तसे यश मिळवू शकली नाही. आणि स्थानिक पार्टी असलेली झारखंड मुक्ती माेर्चाने दणदणीत विजय मिळविला. can EVM get hacked अर्थात हे जेथे जेथे जिंकतील तेथील ईव्हीएम याेग्य आणि हरले की ईव्हीएम खराब असा ढाेंगीपणा चालत नाही. लाेकसभेत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यावेळी भाजपाचे समर्थक प्रचंड नाराज झाले आणि चिडले देखील. त्यामुळे एकमेकांवर आराेप-प्रत्याराेप करायला सुरुवात केली. समाजमाध्यमांवरून या नेत्याला जबाबदार, त्या नेत्याला जबाबदार, धाेरण चुकलं, अजित पवारांना घ्यायला पाहिजे नव्हतं, जागावाटपाचा घाेळ केला, उशीर केला.
 
 
 
 
असे अनेक आराेप सामान्य कार्यकर्त्यांपासून, पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर केले. पण ईव्हीएम किंवा संवैधानिक संस्थांवर कधी आराेप केला नाही. पराजय स्वीकारला आणि नव्या जाेमानं कामाला लागले. त्याचवेळी महाविकास आघाडीने मात्र लाेकसभेत धमाकेदार यश मिळवलं हाेतं. तेव्हा ईव्हीएम ठीक हाेतं. आता दाेन लाेकसभा मतदारसंघात पाेटनिवडणुका झाल्या. एक नांदेड आणि दुसरे वायनाड. can EVM get hacked नांदेड येथे काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आणि वायनाडमध्ये प्रियांका वाढरा जिंकल्या तर, झारखंड झामुमाेनं जिंकलं. त्यावर काही आक्षेप नाही. आक्षेप हरलेल्या जागांवर आहे. आणि भाजपाने मशीन हॅक करून वायनाडमध्ये प्रियांका यांना हरवून काँग्रेसचे नाक कापले असते. आता पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थाेरातांसारखे पडले आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले 200 मतांनी निवडून आले. ईव्हीएम हॅक करून पाडायचंच हाेतं तर, थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला पाडून ताेंड दाखवायला जागा ठेवली नसती ना. चव्हाण आणि थाेरातांसारख्या मवाळ नेत्यांना पाडून भाजपाला मिळणार तरी काय?
 
 
 
 
 
महाराष्ट्र हे उत्तरप्रदेशनंतर सर्वांत माेठं राज्य आहे. साेबतच आर्थिक राजधानीदेखील आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता आणण्यात माेदी-शाहांचं स्वारस्य असेलच, यात शंका नाही. पण ते ईव्हीएम हॅक करून आणण्यात काय स्वारस्य? खरं स्वारस्य तर या दाेघांना आपली सत्ता आणि पदं टिकविण्यात असेल. can EVM get hacked हा मानवी स्वभाव आहे. त्यासाठी केंद्रात सत्ता आणण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करतील ना. मग बदनामी सहनच करायची असेल तर ते स्वतःसाठी बदनाम हाेतील. आपलं पंतप्रधान पद टिकलं पाहिजे यासाठी लाेकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करून, भाजपाचं सरकार बनेल एवढं संख्याबळ आणतील ना माेदी-शाह. ईव्हीएम हॅक करण्यासारखी सवलत उपलब्ध असताना, स्वतः अल्पमतातलं सरकार तारेवरची कसरत करत चालवण्याइतके मूर्ख आहेत हे दाेघं असं विराेधकांना वाटत असेल, तर बुद्धीची दिवाळखाेरी निघालेले यांच्यासारखे दुसरे या भूतलावर आढळणार नाही, हे निश्चित!
 
 
 
 
नुसतं ईव्हीएम ईव्हीएम ओरडून काहीही एक साध्य हाेणार नाही. यांच्या पक्षाला कुठलाही फायदा हाेणार नाही. जनतेच्या प्रश्नावरून सुदृढ राजकारण करण्याऐवजी, पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी संवैधानिक संस्थांना आणि लाेकशाहीला नष्ट करण्याचा घातक प्रयत्न विराेधकांनी चालवला आहे. संविधान आणि लाेकशाही वाचविण्याच्या गप्पा मारणाऱ्यां चं पितळ कालच्या शपथविधी समारंभावर बहिष्कारावरून उघडं पडलं आहे. can EVM get hacked खरंच ईव्हीएमवर आक्षेप असेल तर, मग अवाॅर्ड परत करून आपला विराेध साहित्यिकांनी जसा नाेंदविला हाेता. (हा प्रकार माेदींना बदनाम करण्यासाठीचं षडयंत्र हाेतं, ताे भाग वेगळा) पण त्याचप्रमाणे, ईव्हीएमला विराेध असणाऱ्यांनी आपला निषेध विधानसभा आणि लाेकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नाेंदवावा. आणि माझ्या मतदारसंघात बॅलेटवर निवडणूक घ्यावी असं आवाहन आयाेगाला करावे. पण तसं हे करणार नाहीत.
 
 
 
कारण आराेप केवळ जनेतत संभ्रम निर्माण करून, समाजात विष कालवून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी केल्याचे यांच्या स्वतःच्या मनाला माहिती आहे. राजकारणात जय-पराजय हा चालतच असताे. हरलं तर लाजायचं नाही आणि जिंकलं तर माजायचं नाही... अशी मानसिकता असली पाहिजे. can EVM get hacked आणि अशा पद्धतीची वाईट मानसिकता ठेवली तर, राजकारणात परत कधी उभं राहता येईल असे वाटत नाही. त्यामुळे किमान आधी संविधानानं दिलेल्या आपल्या संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रकार बंद केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधानाचा आदर राखला जाईल आणि लाेकशाहीला वाळवी लागणार नाही. 
 
 
9270333886