महाकुंभात केवळ त्रिवेणी संगमावरच शाही स्नान का केले जाते?

    दिनांक :08-Dec-2024
Total Views |
Shahi Snan Importance प्रयागराजमध्ये, कुंभ व महाकुंभ दरम्यान, त्रिवेणी संगमाच्या काठावर विशेष स्नान केले जाते. हे स्नान शाही स्नान मानले जाते. परंतु, शाही स्नान केवळ त्रिवेणी संगमावर का केले जाते व त्याचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊयायाबद्दल माहिती....
गंगेसह सर्व नद्यांचा कुठे ना कुठे संगम होतो. सर्व नद्यांचे संगम आहेत.परंतु, या सर्वांमध्ये त्रिवेणी संगमाला खूप महत्त्व आहे. गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम या प्रयागराजममध्ये एकत्र होतो. प्रयागराज हे तीर्थक्षेत्र आहे. प्रयागराजमधील गंगा, यमुना व सरस्वती यांचा संगम जगप्रसिद्ध आहे. हिंदू संस्कृतीत गंगा व यमुनेनंतर सरस्वतीला सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. हिंदू धर्मात असे मानले जाते की, सर्व तीर्थक्षेत्रे नद्यांच्या काठावर आहेत. यामध्येही, तीन नद्यांचा संगम असलेल्या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. तिन्ही नद्यांचे मिलन प्रयागराजमध्ये पाहायला मिळते. हेही वाचा : आज या मूल्ल्यांकाचा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा
 
 
snan 
 
 
प्रयाग हा तीर्थक्षेत्रांचा राजा
प्रयागराजच्या संगमावर Shahi Snan Importance गंगा व यमुना वेगळ्या दिसतात. पण त्यात सरस्वतीही मिसळलेली आहे. सरस्वती वेगळी दिसत नाही. सरस्वती नदी अदृश्य मानली जाते. प्रयाग हा तीर्थक्षेत्रांचा राजा मानला जातो. महाकुंभ, कुंभ, अर्धकुंभ या प्रसंगी त्रिवेणी संगमात स्नान करणाऱ्याला मोक्षप्राप्ती होते, असे म्हणतात. महाकुंभ, कुंभ व अर्धकुंभमध्ये एका स्नानाला विशेष महत्त्व आहे, ते म्हणजे शाही स्नान. महाकुंभ, कुंभ व अर्धकुंभ या उत्सवादरम्यान, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर शाही स्नानासाठी वेगवेगळ्या आखाड्यांमधील संत स्नानासाठी येतात.
 
 
स्नानाला शाही का म्हणतात ?
महाकुंभ, कुंभ, Shahi Snan Importance अर्धकुंभ यांसारख्या आयोजनात संतांना आदराने स्नान घातले जाते. म्हणूनच, त्याला शाही स्नान म्हणतात. महाकुंभ किंवा कुंभ काळात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे पाणी चमत्कारी बनते. जेव्हा ग्रह व नक्षत्र अत्यंत शुभ स्थितीत असतात तेव्हाच शाही स्नान केले जाते. या स्नानाने सर्व पापांचा नाश होऊन आत्मा शुद्ध होऊन मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करतो. यावेळी, प्रयागराजमधील महाकुंभ दरम्यान विविध आखाड्यांतील ऋषी-मुनी एकत्र येणार आहेत.